Advertisement

वर्धा अर्बन बँक घोटाळ्यात.सुधाकर साठवणे खरा सूत्रधार ? बँकेत खाते सुरक्षित आहे किंवा नाही ?

समाचार शेयर करें

वर्धा अर्बन बँक घोटाळ्यात.सुधाकर साठवणे खरा सूत्रधार ?
बँकेत खाते सुरक्षित आहे किंवा नाही ?


वर्धा(मंगेश चोरे पाटील) वर्धा येथील वर्धा अर्बन बँकेच्या कथित घोटाळ्याचा खरा सूत्रधार सुधाकर साठवणे असल्याचा आरोप होत असुन हल्ली अटकेत असलेला व्यवस्थापक बोरकर हा केवळ कटपुतळा असल्याचे बोलले जात आहे.वर्धा अर्बन बँकेत असलेल्या ठेवीदारांचे खाते सुरक्षित आहेत काय? बँक लॉकर मधील सोने सुरक्षित आहे किंवा नाही .याची खात्री करणे गरजेचे असल्याचे चर्चेत आहे. तसेच पुढील काळात मोठा घोळ परत पुढे येण्याचे संकेत दिसून येत आहे. प्राप्त माहिती वरून सुधाकर साठवणे यांनी कमी वेळात कोटी रुपयाची माया गोळा केली असून यांचे स्वतःचे खाते मात्र सुरक्षित राष्ट्रीयकृत बँकेत असल्याचे बोलले जाते.साठवणे यांच्या कडे इतक्या कमी वेळात एवढा मोठा कुबेर कोठून आला?हा प्रश्न पुढे येत आहे.हल्ली यांच्या वर्धा अर्बन बँकेत अनेकांच्या फिक्स डीपॉजीट आहेत.मात्र या कागदावर आहेत की  खरोखर ग्राहकांना वेळेवर मिळेल की नाही?याची शाश्वती नसल्याचे बोलले जात आहे.या बँके संदर्भात अनेक चर्चा बाजारात कानावर येत असून अनेकांनी आपले खाते बंद करण्याचा निर्णय घेतला असुन या घोटाळ्यात खरा सूत्रधार सुधाकर साठवणे हाच असल्याचे कर्मचारी चर्चा करीत असून पुढील काळात मोठा प्रकार पुढे येईल असे सुद्धा व्यक्त करीत असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!