Advertisement

कळमना ठाणेदार प्रवीण काळे यांना महासंचालक पदक – मानवाधिकार संघटनेकडून सत्कार

समाचार शेयर करें

कळमना ठाणेदार प्रवीण काळे यांना महासंचालक पदक – मानवाधिकार संघटनेकडून सत्कार

नागपूर (अभिषेक उर्फ बंटी शर्मा)

कळमना पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री. प्रवीण काळे यांना उत्कृष्ट सेवेसाठी महासंचालक पदक प्राप्त झाल्याबद्दल मानवाधिकार संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री. मंगेश चोरे पाटील यांनी श्री. काळे यांच्या कार्याची प्रशंसा करत, त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, अशा प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे समाजात नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होतो.

सत्कार सोहळ्यावेळी पत्रकार अभिषेक शर्मा तसेच इम्रान शेख.वर्धा उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी श्री. प्रवीण काळे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मानवाधिकार संघटनेने अशा कार्यक्षम अधिकाऱ्यांचा सत्कार करून समाजात सकारात्मक संदेश देण्याचे कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!