- जागतिक पर्यावरण दिवस वृक्षारोपण शुभारंभ व रजत जयंती निसर्ग संदेश विशेषांकाचे प्रकाशन…
निसर्ग सेवा समिती द्वारा आयोजन… 
वर्धा( प्रती)
44 वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाने मानवी पर्यावरण या विषयावर परिषद घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आपल्या सर्व राष्ट्रांनी मानवी पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करण्याची पावले उचलण्याचा ठराव केला. त्यानुसार पाच जुन आपण जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करतो अशा आजच्या निराशा जनक वातावरणातही काही थोडेफार पर्यावरण प्रेमी काम करत आहेत त्यात वर्धेतील निसर्गसेवा समितीच्या कार्यास चार दशक पूर्ण झाले.तर ऑक्सिजन पार्क निर्मितीस पंचवीस वर्षे पूर्ण झाले ,ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.आज पंचवीस हजार वृक्षांचा हरित पट्टा तयार झाला आहे.
वर्ष 2000 पासून सुरू झालेला हा प्रवासास आज. 25 वर्ष पूर्ण होत आहे.ज्यामध्ये 25000 च्या विविध प्रजातीची रोपांची लागवड करून त्याचे संरक्षण संवर्धन मुरलीधर बेलखोडे अध्यक्ष निसर्ग सेवा समिती त्यांचे सर्व सहकारी सातत्याने करीत आहेत. वृक्षारोपणाचे समितीचे काम
इतरांना प्रेरणादायी असे आहे.असे विचार डॉ पंकज भोयर पालकमंत्री वर्धा यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून व्यक्त केले. पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने निसर्ग सेवा समिती द्वारा निर्मित ऑक्सिजन पार्क ला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहे त्या निमित्ताने रजत जयंती निसर्ग संदेश विशेषांकाचे प्रकाशन व वृक्षारोपण शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन निसर्ग सेवा समिती द्वारे ऑक्सिजन परिसरात करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे राज्यमंत्री गृह शालेय शिक्षण सहकार खनिज व पालक डॉ पंकज भोयर तर प्रमुख उपस्थिती मध्ये ज्येष्ठ समाजसेवक मोहन बाबू अग्रवाल, माजी अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ श्री प्रदीपजी दाते बँक ऑफ इंडिया आंचलिक प्रबंधक विदर्भ अंचलचे श्री निरमेशजी ,श्री संजय इंगळे देगावकर प्रसिद्ध कवी वर्धा डॉ प्राध्यापक राजेंद्र मुंढे,बुलढाणा अर्बन बँकेची विभागीय व्यवस्थापक श्री राजेश्री बगाडे जलसंपदा कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे कार्यलक्ष्मी अध्यक्ष ओंकार जी धावडे औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे सह प्राचार्य श्री कोकुलवार, पीपल फॉर ॲनिमल चे आशिष गोस्वामी सप्त खंजिरी वादक भाऊसाहेब थुटे यांची उपस्थिती होती.
5 जून जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने या वर्षभरात (ट्री गार्ड सह)1000 वृक्ष रोप वृक्ष लावण्याचा संकल्प सर्व निसर्ग सेवकांनी घेतला त्याचा शुभारंभ आज माननीय डॉ पंकज भोयर पालकमंत्री यांच्या हस्ते ऑक्सिजन पार्क आयटीआय कॉलेजच्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोप लावून करण्यात आला श्री राजेश बगाडे ,प्रमोद भोयर,श्री गवई श्री भोमले डॉ बोरकर कुमार अभिनंदन रामदासजी ढोणे ,वाढदिवस, व विवाह वर्धापन वृक्ष या संकल्पनेंतर्गत वृक्षरोपांसाठी वृक्ष संरक्षक उपलब्ध करून दिले.
निसर्ग सेवा समिती द्वारा दरवर्षी देण्यात येणारा रजत जयंती आदर्श निसर्ग हरित शाळा पुरस्कार प्राचार्य श्री रवींद्रजी गोडे प्राचार्य, नीलकंठ मुरार घटवाई कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडनेर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा या महाविद्यालयाला दिला.वृक्ष लागवड ,
पर्यावरण संवर्धन, जल पुनर्भरण किचन गार्डन हा संस्कार म्हणून विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे , विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाशी नाते जोडण्याकरता मौलिक कार्य करणे त्याबद्दल पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते शाल स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
2000 ते 2026 या पंचवीस वर्षांत ऑक्सिजन पार्कच्या निर्मितीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करण्यासाठी निस्वार्थ योगदान देणारे सर्व कार्यकर्ते शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी श्रमदान करणारे पाणी घालणारे पाणी व्यवस्थापन आर्थिक मदत उपलब्ध करून देणारे या सर्वांचे आपल्या प्रस्ताविकेतून निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी ऋण व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री प्रमोद खोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सप्त खंजिरी वादक भाऊसाहेब थुटे यांनी मानले. राष्ट्र वंदननेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
मानपत्राचे वाचन पांडुरंग भालशंकर यांनी केले. सौ दाते मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. राजेश बगाडे दिनेश चन्नावार डॉ राजेंद्र बोरकर डॉ प्रा राजेंद्र मुंडे श्री प्रशांत ठाकरे रवी कांबळे यांचा, मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
विठ्ठल गेडाम अमोल, भुजंगराव भांदककर सतीश धवणे गणेश पुसदकर दत्तात्रय देशपांडे,प्रवीण पेटकर मनोज डेकाटे ,बाबाराव भोयर प्रमोद भोयर दिलीप वाकडे विजय भगत बाळकृष्ण पडवे सुनील सुटे राजकुमार वासेकर राजेंद्र
घोडमारे विनायक चांभारे हाडेकर गुरुदेव सेवा मंडळ पतंजली योग निसर्ग सेवा समिती सर्व कार्यकर्ते तसेच वर्धा शहरातील गणमान्य मंडळी बहुसंख्येने संख्येने उपस्थित होते.














Leave a Reply