भेसळ पेट्रोल ने परत शहरातील अनेकांची वाहने खराब?
महिला आश्रम येथील पेट्रोल पंपात भेसळ असल्याचा आरोप.

वर्धा(मंगेश चोरे पाटील) मागील कळतात भेसळ करण्या करिता आणलेले पेट्रोल पोलिसांनी रंगेहात पकडल्याने सर्वत्र चर्चेत आलेल्या गिरीश राजपाल यांच्या पेट्रोल पंपात परत भेसळ सुरू असल्याचे बोलले जाते.केळझर येथील महामार्गावरील चोरीचे डिझेल पेट्रोल आणि त्यात मिश्रीत सालवंट मुळे अनेकांची वाहने खराब झाल्याचे सूत्रांकडून पुढे आले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून सरकारी वाहनात याच पेट्रोल पंपावरून पेट्रोल डिझेलचा भरणा होत असताना अनेक सरकारी वाहनात सुद्धा बिघाड आल्याचे बोलले जाते.हल्ली अनेक विभागाने या ठिकाणाहून डिझेल पेट्रोल भरणे बंद केल्या पासून सरकारी वाहनात मेंटेनन्स चे कामही कमी झाल्याचे पुढे आले आहे.
हल्ली गिरीश राजपाल यांच्या पेट्रोल पंपात भेसळीचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे बोलले जात असुन नुकत्याच काहींनी आपल्या वाहनात इंजिन खराब झाल्याचे व्यक्त केले आहे.सदर पेट्रोल पंपात नागपूर येथील रेल्वे स्टेशन परिसरातील एका केमिकल विक्रेत्या कडून सालवंट आणले जाते.हे सालवंट पेट्रोल आणि डिझेल यात मिसळून विक्री केली जाते असा आरोप होत आहे.
मागील काळात याच परिसरात पोलिसांचा पेट्रोल पंप होत असताना जनतेला योग्य पेट्रोल मिळेल त्यामुळे आपला पंप बुडेल या भीतीने गिरीश राजपाल याने मोठे षडयंत्र रचुन पोलिसांच्या पेट्रोल पंपाचे काम बंद पडले.हल्ली भेसळ पेट्रोल मुळे त्रस्त झालेल्यांनी या ठिकाणाहून पेट्रोल डिझेल भरणे बंद केल्याचे पुढे आले आहे.















Leave a Reply