Advertisement

आधी थोपटली पाठ, नंतर केले भुईसपाट* *”नागपूरचे आर. टी. ओ. किरण बिडकर निलंबित”*

समाचार शेयर करें

*आधी थोपटली पाठ, नंतर केले भुईसपाट* *”नागपूरचे आर. टी. ओ. किरण बिडकर निलंबित”**आर. टी. ओ. किरण बिडकर यांना आधी प्रशस्तीपत्र आणि लगेचच निलंबनाची ऑर्डर* *स्कुल बस अपघात प्रकरणी निष्काळजी पणा केल्याचा ठपका* *नागपुर परिवहन विभागात मोठी खळबळ*

नागपूर(मंगेश चोरे पाटील)*”2 तारखेला कौतुक, 7 तारखेला निलंबन”*बातमी वाचा… आणि विचार करा….

दि. 12/9/2025 रोजी नागपुरात झालेल्या स्कुल बस व स्कुल व्हॅन अपघात प्रकरणी नागपूर शहर चे आर. टी. ओ. किरण बिडकर यांना महाराष्ट्र शासनाने दोषी ठरवून त्यांना प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावरून दि. 7 मे रोजी निलंबीत केले आहे. या स्कुल बस व व्हॅन अपघातात एका विध्यार्थ्याचा व स्कुल व्हॅन चालकाचा मृत्यू झाला होता. या अपघातातील स्कुल बस चे रस्त्यावर चालण्याचे फिटनेस प्रमाणपत्र नव्हते. फिटनेस प्रमाणपत्र नसतांना हे वाहन विध्यार्थ्यांना शाळेत ने-आन करीत होते. योग्यता प्रमाणपत्र नसतांना सुद्धा स्कुलबस शाळेच्या विध्यार्थ्यांना शहरात कश्याकाय घेऊन चालतात? आर टी ओ अधीकारी या वाहनांची नियमित तपासणी करीत नाहीत का? असा प्रश्न या निमित्ताने नागपुरातील पालक विचारीत होते. याबाबत नागपूर अधिवेशनात विधानसभेतही आर टी ओ च्या कार्यप्रणालीवर चर्चा झाली होती. या प्रकरणात आर टी ओ किरण बिडकर यांनी कार्यालय प्रमुख या नात्याने आपल्या कर्तव्यात हयगय व निष्काळजीपणा केला आहे असा ठपका ठेऊन त्यांना 7 मे रोजी सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे.

विशेष बाब म्हणजे किरण बिडकर यांनी नागपूर आर टी ओ म्हणून नागपूर शहरात रस्ता सुरक्षा या विषयावर जनजागृती बाबत अनेक उपक्रम राबविले, शाळा महाविद्यालयातून जनजागृती केली, चालकासाठी प्रशिक्षण, जनतेला वाहतूक नियमांचे धडे देऊन शहरात अपघाताचे प्रमाण कमी करण्याबाबत उल्लेखनीय कामगिरी केली म्हणून केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी 2 मे रोजी प्रमाणपत्र देऊन किरण बिडकर यांचे अभिनंदन केले. त्यामुळे 2 तारखेला प्रमाणपत्र देऊन शाबासकी व त्याच कारणासाठी आकार्यक्षम ठरवून 7 तारखेला पदावरून निलंबन असा विचित्र योगायोग नागपूरचे आर टी ओ किरण बिडकर यांच्या बाबत घडल्याचे बोलले जात आहे.

या दोन्ही प्रकारात नागपूर आर टी ओ तील अधिकार्यांमधील अंतर्गत हेवेदावे, स्पर्धा व पदासाठी ची चढओढ हे सुद्धा मोठे कारण असल्याचे काही अधिकारी खासगीत चर्चा करीत असल्याचे दिसून आले.आधी थोपटली पाठ, नंतर केले भुईसपाट नागपूरचे आरटीओ किरण बिडकर निलंबित; प्रशस्तीपत्रानंतर अवघ्या पाच दिवसांत कारवाई Kiran Bidkar यांना महाराष्ट्र शासनाने प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावरून निलंबित केल्याने नागपूर परिवहन विभागात मोठी खळबळ उडाली आहे. 12 सप्टेंबर 2025 रोजी नागपुरात झालेल्या शाळा बस आणि शाळा व्हॅन अपघात प्रकरणी कर्तव्यात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणाचा ठपका ठेवत 7 मे रोजी ही कारवाई करण्यात आली.या भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा तसेच शाळा व्हॅन चालकाचा मृत्यू झाला होता. तपासादरम्यान संबंधित शाळा बसकडे वैध फिटनेस प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले. फिटनेस प्रमाणपत्र नसतानाही वाहन विद्यार्थ्यांची वाहतूक करत होते, यामुळे परिवहन विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते.नागपूरमधील पालकांनी “योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने रस्त्यावर कशी धावत होती?” असा सवाल उपस्थित केला होता. या प्रकरणाचे पडसाद नागपूर अधिवेशनातही उमटले होते आणि विधानसभेत आरटीओ विभागाच्या कार्यपद्धतीवर चर्चा झाली होती.शासनाच्या आदेशानुसार, कार्यालय प्रमुख म्हणून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात Kiran Bidkar यांनी हयगय केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, अवघ्या पाच दिवसांपूर्वीच केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांनी रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल 2 मे रोजी Kiran Bidkar यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला होता. शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती, चालक प्रशिक्षण आणि वाहतूक नियमांबाबत मोहिमा राबवल्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात आले होते.मात्र, त्याच अधिकाऱ्यांवर काही दिवसांतच निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई झाल्याने “आधी शाबासकी, नंतर निलंबन” असा विचित्र योगायोग नागपूरमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.दरम्यान, या प्रकरणामागे विभागातील अंतर्गत मतभेद, पदासाठीची स्पर्धा आणि अधिकाऱ्यांतील हेवेदावेही कारणीभूत असल्याची चर्चा परिवहन विभागातील काही अधिकारी खासगीतकरत असल्याचे समोर येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!