Advertisement

सेलू पोलिस ठाण्याला नवे ठाणेदार; पंकज वाघोडे यांची नियुक्ती

समाचार शेयर करें

 

सेलू पोलिस ठाण्याला नवे ठाणेदार; पंकज वाघोडे यांची नियुक्ती

वर्धा (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सेलू पोलिस ठाण्याच्या ठाणेदारपदी श्री. पंकज वाघोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेलूचे विद्यमान ठाणेदार श्री. गभणे यांची जिल्ह्याबाहेर बदली झाल्याने त्यांच्या जागी वाघोडे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

श्री. पंकज वाघोडे हे मागील दीड वर्षांपासून सावंगी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत विविध अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यात आली. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई, सरदार बेड्यावरील जुगार अड्ड्यांवर धाड, पुलगाव मार्गावरील चोरीच्या तांदळाच्या वाहतुकीवर आळा तसेच डिझेल-पेट्रोल तस्करीसारख्या अवैध व्यवसायांवर नियंत्रण मिळविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली.

याशिवाय परिसरात सुरू असलेल्या विविध अवैध धंद्यांवरही त्यांनी प्रभावीपणे अंकुश ठेवला होता. त्यामुळे सावंगी परिसरात शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते.

दरम्यान, वाघोडे यांच्या बदलीनंतर सावंगी पोलिस ठाण्याचा पदभार श्री. गिरी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने हे फेरबदल करण्यात आल्याची माहिती आहे.

हे प्रशासकीय फेरबदल जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या आदेशानुसार करण्यात आले आहेत. नव्या नियुक्तीनंतर सेलू परिसरातील नागरिकांनी श्री. पंकज वाघोडे यांच्याकडून प्रभावी पोलिसिंगची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!