Advertisement

बांधकाम विभागातील मोकलकर डिप्लोमा यांचा वर्तमानपत्रात खुलासा प्रकाशित; आता टिकले अडचणीत?

समाचार शेयर करें
बांधकाम विभागातील मोकलकर डिप्लोमा यांचा वर्तमानपत्रात खुलासा प्रकाशित; आता टिकले अडचणीत?

हेच ते महेश मोकलकर उर्फ (डिप्लोमा) यांनी वर्तमान पत्रात सरकारच्या पैशाने खोटा खुलासा करून.जनतेत संभ्रम निर्माण निर्माण केला.वास्तविक विभागीय चौकशी सुरू असताना कुणाच्या आदेशाने खोटा खुलासा केला… हे डिप्लोमा यांनी स्पष्ट करावे अशी मानवाधीकार संघटनेची मागणी आहे.

वर्धा (मंगेश चोरे पाटील) – वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागातील कायमस्वरूपी कार्यरत असलेल्या मोकलकर नामक डिप्लोमा अधिकाऱ्यांनी चौदा कोटी रुपयांच्या कथित अफरातफरी संदर्भात प्रकाशित झालेल्या बातमीवर एका वर्तमानपत्रात खुलासा प्रकाशित केला आहे. मानवाधिकार संघटनेकडून करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने बांधकाम विभागातील चौदा कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले असून, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात कार्यकारी अभियंता टिकले यांचे नाव चर्चेत आले असून, प्रकरण शासन स्तरापर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर या विषयाला अधिक गंभीर वळण मिळाले असून, टिकले यांच्यासह डी. पी. जैन नावाची कंपनीही चर्चेत आली आहे.

दरम्यान, मोकलकर यांनी एका वर्तमानपत्रात जाहिरात स्वरूपात आपली भूमिका स्पष्ट करत आपण या प्रकरणाशी संबंधित नसल्याचे म्हटले आहे. मात्र, या खुलाशामुळे प्रकरण आणखी चर्चेत आले आहे.

तक्रारीनुसार, चौदा कोटी रुपये डी. पी. जैन कंपनीला देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित काम पूर्ण झाले नसतानाही देयके देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, यासंदर्भातील कागदपत्रे मानवाधिकार संघटनेने शासनाकडे सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर शासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात मोकलकर यांची भूमिका नेमकी काय होती, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी चंद्रपूर येथील कार्यकारी अभियंता यांच्या स्तरावर सुरू असल्याची माहिती आहे.

क्रमशः – वाचा, मोकलकर डिप्लोमा यांचा नेमका काय रोल?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!