Advertisement

डी. पी जैन कंपनी ब्लॉक लिस्ट करण्याची मागणी वर्धेच्या कार्यकारी अभियंता टिकले यांची चौकशी..

समाचार शेयर करें

डी. पी जैन कंपनी ब्लॉक लिस्ट करण्याची मागणी

वर्धेच्या कार्यकारी अभियंता टिकले यांची चौकशी..

वर्धा(मंगेश चोरे पाटील)

वर्धा येथील कार्यकारी अभियंता श्री. एकनाथ टिकले याने जनतेच्या पैशावर डल्ला मारला.काम न करता नागपूरच्या ठेकेदार डी पी जैन या कंपनीला चौदा कोटी रुपयाचे देयक दिले.त्यातून याने पन्नास टक्के कमिशन आपल्या नातेवाईकांच्या नावाने जमा केले.सविस्तर माहितीच्या आधारे नागपूर येथील मुख्य अभियंता श्री.माने यांच्या कडे प्रकरण जातच तत्काळ सरकार कडे पटविण्यात आल्याने यांचे पितळ उघडे पडले.सदर प्रकरण अद्याप विरोधकांच्या हाती पडले नाही.मात्र लवकरच या प्रकरणाला हवा मिळणार असे संकेत आहे.इतकेच नव्हे तर डी पी जैन या कंपनीने अनेक कामे या प्रकारचे केले असुन हळू हळू हे सगळे प्रकाराने आता लवकरच पुढे येणार आहे.सदर बाब दाबण्याकरिता वर्धेचे कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले यांनी मोठी ताकत लावण्याचा प्रयत्न केला मात्र आता हे प्रकरण मानवाधिकार आयोगात दखल करण्यात आल्याने याचा मोठा खुलासा होणार असे संकेत आहे.तर ऐकण्यात टिकले या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला आपली नौकरी गमवावी लागेल असे संकेत मिळत आहे.

डी पी जैन या कंपनीच्या माध्यमातून अनेक कामात केला गेलेला भ्रष्टाचार आणि काम न करता केली गेलेली पैशाची उचल असे अनेक प्रकरणे आता खुले होणार असले तरी वर्धा येथील कार्यकारी अभियंता टिकले यांची लाच लुचपत विभागाने चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे… लवकरच या प्रकरणातील सत्यता पुढे येणार असे संकेत आहे

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!