Advertisement

सेलूत जनता खुश: ठाणेदार ठाकूर यांची अखेर हकालपट्टी मंत्र्यांच्या नावावर चालला होता कारभार? गंभीर आरोपांमुळे कारवाई

समाचार शेयर करें

सेलूत जनता खुश: ठाणेदार ठाकूर यांची अखेर हकालपट्टी

मंत्र्यांच्या नावावर चालला होता कारभार? गंभीर आरोपांमुळे कारवाई

वर्धा | प्रतिनिधी – मंगेश चोरे पाटील

वर्धा जिल्ह्यात सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, काही अधिकारी व व्यक्तींकडून मंत्र्यांच्या नावाचा गैरवापर करून बेकायदेशीर कृत्ये केल्याचे प्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशाच प्रकारामुळे सेलू तालुक्यातील ठाणेदार ठाकूर यांची अखेर हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.स्थानिक नागरिकांच्या मते, ठाणेदार ठाकूर हे “मी मंत्र्यांच्या शिफारशीने आलो असून मला कोणीही काही करू शकत नाही”एस पी. आय.जी सुद्धा..असे उघडपणे सांगत होते. याच धाकावर त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये कथितपणे आर्थिक देवाणघेवाण केल्याचे आरोप करण्यात येत आहेत.ठाकूर यांची सुरुवातीला सिंधी (रेल्वे) येथे नियुक्ती होती. त्यानंतर त्यांनी सेलू पोलिस स्टेशनमध्ये बदली मिळवली. दरम्यान, हिंगणघाट येथे घडलेल्या एका बलात्कार प्रकरणात लाखो रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा गंभीर आरोप आहे. हा प्रकार तत्कालीन पोलिस अधीक्षकांच्या निदर्शनास येताच ठाकूर यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांची हकालपट्टी करण्यात आली.त्यानंतर पुन्हा मंत्र्यांच्या शिफारशीचा आधार घेत त्यांनी सेलू ठाणेदारपद मिळवल्याची चर्चा आहे. मात्र, यावेळी तत्कालीन ठाणेदार गभणे यांनी न्यायालयात धाव घेतली आणि प्रकरण अधिकच गंभीर झाले. परिणामी ठाकूर यांना पुन्हा एकदा पदावरून हटवण्यात आले.या संपूर्ण कालावधीत सेलू परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे नागरिक सांगतात. केळझर गावात खुलेआम डिझेल-पेट्रोल विक्री, कोंबडी बाजार, गावठी दारूचा व्यवसाय, लाखो रुपयांचा जुगार आणि इतर अनैतिक प्रकार वाढल्याचा आरोप करण्यात येत आहे.स्थानिक जनतेतून या सर्व प्रकारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, “अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी” अशी मागणी जोर धरत आहे.या प्रकरणातील काही धक्कादायक बाबी पुढील भागात उघड करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

(क्रमश🙂

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!