Advertisement

वरिष्ठ निरीक्षक प्रवीण काळे यांचा गौरव; पोलिस महासंचालक सन्मानचिन्हाने सन्मान

समाचार शेयर करें

वरिष्ठ निरीक्षक प्रवीण काळे यांचा गौरव; पोलिस महासंचालक सन्मानचिन्हाने सन्मान

नागपूर (अभिषेक बंटी शर्मा)

कर्तव्यनिष्ठ सेवा आणि उत्कृष्ट पोलिसिंगसाठी ओळखले जाणारे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण काळे यांना यंदाच्या महाराष्ट्र दिनानिमित्त प्रतिष्ठेचा पोलीस महासंचालक (DGP) सन्मानचिन्ह पुरस्कार जाहीर झाला आहे.

काळे सध्या नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्यात कार्यरत असून, त्यांनी विविध गुन्हे तपास, ऑपरेशन्स आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रकरणांमध्ये प्रभावी कामगिरी झाल्याने त्यांची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली.

महाराष्ट्र दिन (१ मे) निमित्त जाहीर करण्यात आलेल्या या सन्मानचिन्हांमध्ये गडचिरोलीसह विविध जिल्ह्यांतील पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नक्षलविरोधी कारवाया, तपास कौशल्य आणि उत्कृष्ट सेवा या निकषांवर निवड करण्यात आली असून, या पुरस्कारामुळे पोलिस दलाचे मनोबल अधिक उंचावणार आहे.

प्रवीण काळे यांच्या या यशामुळे नागपूर पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या कार्याची राज्यभरात दखल घेतली जात आहे. सहकारी अधिकारी व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!