श्री. अनुराग जैन यांची मुंबईत डीसीपी पदावर नियुक्ती

वर्धा (मंगेश चोरे पाटील)
पोलिस विभागात प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले श्री. अनुराग जैन यांची मुंबई येथे डीसीपी पदावर बदली करण्यात आली आहे.वर्धा जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली. जिल्ह्यातील ढासळलेली शांतता पुन्हा प्रस्थापित करून पोलिस यंत्रणेत शिस्त आणि कार्यक्षमता आणण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्यांच्या कार्यशैलीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.दरम्यान, वर्धा जिल्ह्यातील काही राजकीय परिस्थिती आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांना होणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर त्यांची नागपूर येथे बदली करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या प्रामाणिकपणा, शिस्तप्रियता आणि उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना आता मुंबईसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी डीसीपी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा आमिष न स्वीकारता निष्पक्षपणे काम करणारे अधिकारी म्हणून श्री. जैन यांची ओळख आहे. वर्धा जिल्ह्यातील त्यांच्या कार्याची आठवण नागरिक आणि पोलिस दलात कायम राहील, असे बोलले जात आहे.नवीन जबाबदारीसाठी त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













Leave a Reply