Advertisement

पटेल चौकात पानठेल्या आडून चालणारा सट्टा बाजार गुन्हे शाखेने पकडला. 

समाचार शेयर करें

पटेल चौकात पानठेल्या आडून चालणारा सट्टा बाजार गुन्हे शाखेने पकडला. 

हाच तो सट्टा किंग शहजाद

वर्धा(मंगेश चोरे पाटील)

वर्धा येथील पटेल चौकात एस. के पानटपरी आडून चालत असलेल्या सट्टा बाजारावर आज भर उन्हात गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक श्री.विनोद चौधरी यांनी धाड टाकली.मोठ्या प्रमाणात साहित्य आणि तिन लोकांना रंगेहात अटक केली आहे.

अधिकाऱ्यांना पत्रकारांना मोठी देण देऊन आपण धंदा करतो म्हणत असलेल्या शहजाद याचा पोलिसांनी आज पोळा फोडला आहे.रोज लाखो रुपयांचा बाजार चालविण्या करिता जुन्या नगर परिषदेच्या भिंतीला भोक पडून फुकटचे दुकान लाऊन बसलेल्या शहजाद याचे पोलिसांनी बिंग फोडले आहे.

मागील काळात आम्ही याच्या अनेक बातम्या प्रकाशित केल्या होत्या काही दिवस बंद असलेला धंदा परत जोमाने सुरू करून अधिकारी आणि पत्रकारांना विकत घेतले असे बोलुन परत जोमाने धंदा करणारा सट्टा गुन्हे शाखेच्या वतीने उधळून लावला आहे.यात तीन लोकांना रंगेहात पकडले अशी माहिती आहे.पुढील कारवाई सुरू असुन…सविस्तर दुसऱ्या भागात वाचा

..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!