Advertisement

अखेर सेलुचे नवे ठाणेदार मनोज गभणे,ठाकूर यांची मुख्यालयात रवानगी….

समाचार शेयर करें

अखेर सेलुचे नवे ठाणेदार मनोज गभणे,ठाकूर यांची मुख्यालयात रवानगी….

न्यायालयाचा निकाल.. आता सर्व अवैद्य धंदे होणार बंद.

वर्धा(मंगेश चोरे पाटील)

मागील काळात सेलु येथे कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षक श्री.मनोज गभणे यांची अचानक बदली करून ठाकूर यांना ठाणेदारी देण्यात आली.नियमबाह्य बदली केल्या प्रकरणी तत्कालीन ठाणेदार श्री.गभणे यांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले.सदर प्रकरणात मागील चार महिन्यापासुन प्रकरण सुरू होते.सदर बदली ही नियमबाह्य करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने आज निकाल देण्यात आला आणि श्री.मनोज गभने यांना पूर्ववत सेलु ठाणेदार म्हणुन कार्यरत होण्याचे आदेश देण्यात आले.

हल्ली सेलू येथील ठाणेदार ठाकूर यांच्या कार्यकाळात परिसरात अत्यंत मोठ्या प्रमाणात अवैध्य धंदे वाढले असुन. केळझर येथील डिझेल धंदा या निकालाला कारणीभूत ठरला असून अनेक वेळा वर्तमान पत्रात प्रकाशित झालेल्या बातम्या सुद्धा महत्वाच्या ठरल्या आहेत.परिसरातील जुगार,दारू,आणि अनेक अवैध्य धंदे अत्यंत झपाट्याने वाढले असताना.वर्तमान पत्रात प्रकाशित झालेल्या बातम्यांची कोणतीही दखल घेण्यात आली नाही.ज्या राजकीय नेत्याच्या शिफारशीने बदली झाली त्या नेत्याचा सुद्धा विचार केला गेला नाही.या बदलीने त्या नेत्याला सतत कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागले मात्र परिसरातील अवैध्य धंदे बंद झाले नाही.

असे अनेक करणे पुढे आले असुन.ठाकूर यांची अशीच हिंगणघाट येथूनही रातोरात बदली करण्यात आली होती.

ठाकूर यांचे दोन अत्यंत मोठे प्रकरणे जे पोलिस विभागाला कलंकित करणारे असुन नागपूर येथून कळ्या रंगाच्या वाहनात कपडे भरलेली बॅग घेऊन आलेल्या त्या कोण? आणि वर्धा येथील त्या कोण?याचा उलगडा लवकरच होणार असे संबंधितांनी बोलुन दाखविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!