Advertisement

घोराडमध्ये ‘घंगारे प्रकरण’ तापले धमकीनंतर पत्रकारावर हल्ला; संतप्त पत्रकारांची कारवाईची मागणी

समाचार शेयर करें

घोराडमध्ये ‘घंगारे प्रकरण’ तापले धमकीनंतर पत्रकारावर हल्ला; संतप्त पत्रकारांची कारवाईची मागणी

हाच तो रामेश्वर घंगारे उर्फ(रामु) सेलू येथील एका गरीब महिलेच दुकान दाबण्याचा पहिला पर्यंत करणारा घोराड गावचा माजी उपसरपंच.आता आला राजकारणात.बोगस ठेकेदारी,पत्रकाराने प्रकरण उचलताच खानदानी सहित हमला करणारे.. म्हणे आम्ही मंत्र्याचे … आज जरी हे मंत्र्याचे आहे म्हणत असले तरी हे कुणाचे नाही.पूर्वी होते राना चे….. पुढे कुणाचे ?

वर्धा (प्रतिनिधी)

सेलू तालुक्यातील घोराड गावात घडलेल्या एका गंभीर घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. स्थानिक पत्रकारावर झालेल्या कथित हल्ल्यामुळे पत्रकार सुरक्षा आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, घोराड येथील विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान संदर्भात बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर पत्रकार राजेश वटकर हे काही स्थानिक नेत्यांच्या निशाण्यावर आले. या बातम्यांमुळे संतप्त झालेल्या माजी उपसरपंच रामेश्वर उर्फ रामु घंगारे आणि माजी सरपंच ज्योती घंगारे (घंगारे मॅडम) यांनी ९ एप्रिल रोजी वटकर यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.या संदर्भात वटकर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करून संरक्षणाची मागणी केली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, १० एप्रिल रोजी सकाळी ठाणेदारांच्या निवासस्थानासमोरच रस्त्यावर वटकर यांच्यावर काही जणांनी हल्ला करून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पत्रकारांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली .या घटनेच्या निषेधार्थ सेलू तालुक्यासह जिल्ह्यातील पत्रकारांनी एकत्र येत पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली.

पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत तात्काळ कारवाई करावी, तसेच संबंधित ठाणेदाराच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणात आरोपींना तात्काळ अटक करावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी लवकरच एक शिष्टमंडळ नागपूर येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

घोराडमधील हा वाद आता केवळ एका घटनेपुरता मर्यादित राहिला नसून, पत्रकारांच्या सुरक्षिततेचा आणि प्रशासनाच्या जबाबदारीचा मोठा प्रश्न बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!