Advertisement

सट्टाकिंग शहजादच्या कारनाम्यामुळे अनेक दुकाने उठणार?

समाचार शेयर करें

सट्टाकिंग शहजादच्या कारनाम्यामुळे अनेक दुकाने उठणार?

जुन्या नगरपरिषदेसमोरील अतिक्रमण हटवण्याची तयारी; पोलिसांची नजर टपून

वर्धा (प्रतिनिधी):
वर्धा शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या इमारतीत सुरू असलेल्या जुगार व सट्टा बाजारामुळे परिसरातील परिस्थिती चिघळली असून, यामागे सट्टाकिंग शहजाद याचे नाव पुढे येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणामुळे परिसरातील अनेक दुकाने अतिक्रमणाच्या कारवाईत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून या सट्टा बाजाराबाबत सातत्याने बातम्या प्रकाशित होताच पोलिस प्रशासनही सतर्क झाले आहे. विशेषतः शहजादच्या ‘एस.के. पान टपरी’कडे पोलिसांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

दरम्यान, नगरपरिषदेच्या इमारतीत सुरू असलेला हा बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी परिसरात काही ठिकाणी ‘चलता-फिरता’ पद्धतीने सट्टा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे संबंधितांना पकडणे पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे. मात्र, लवकरच सट्टाकिंग शहजादला अटक होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या सगळ्या प्रकाराचा फटका मात्र स्थानिक प्रामाणिक दुकानदारांना बसण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना अतिक्रमण कारवाईमुळे आपली दुकाने गमवावी लागू शकतात.

सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच या परिसरात अतिक्रमण हटवण्याची मोठी मोहीम राबवली जाणार असून, बुलडोझर कारवाईचे संकेत संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!