राजपालच्या डिझेल चोरीची सखोल चौकशी करा; मोखाडे यांचे आंदोलन, पत्रकार पाणबुडे यांच्यावर गंभीर आरोप
वर्धा (मंगेश चोरे पाटील): वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आज समाजसेवक विल्सन मोखाडे यांनी रखरखत्या उन्हात फलक घेऊन आंदोलन करत गिरीश राजपाल यांच्या डिझेल-पेट्रोल प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
मोखाडे यांनी दिलेल्या निवेदनात जय महाराष्ट्र चॅनलचे पत्रकार प्रमोद पाणबुडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या मते, पाणबुडे हे गिरीश राजपाल यांच्या डिझेल टोळीतील महत्त्वाचे सहकारी असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला.
काही दिवसांपूर्वी गिरीश राजपाल यांच्याकडून लाखो रुपयांचे डिझेल-पेट्रोल पोलिसांनी जप्त केले होते. त्या वेळी पाणबुडे हे पोलिसांशी सेटलमेंट करण्याच्या भूमिकेत असल्याचा आरोप मोखाडे यांनी केला आहे. जिल्ह्यातील अनेक वर्तमानपत्रांमध्ये या कारवाईची बातमी प्रसिद्ध झाली असतानाही पाणबुडे यांनी आपल्या चॅनलवर ही बातमी दाखवली नाही, असा दावा देखील त्यांनी केला.
वर्धा शहरातील महिला आश्रम परिसरातील गिरीश राजपाल यांच्या पेट्रोल पंपावर भेसळयुक्त पेट्रोल-डिझेल विकले जात असल्याची चर्चा होती. पोलिसांनी १ तारखेला कारवाई करत राजपाल यांना रंगेहात पकडून अटक केली. पोलिसांनी या संदर्भात प्रेस नोटही जारी केली होती.
मोखाडे यांनी पुढे आरोप केला की, पाणबुडे हे सोशल मीडियावर महिलांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करतात तसेच पत्रकारितेच्या आडून अवैध धंदे चालवतात. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा सखोल चौकशी करून पाणबुडे यांना देखील आरोपी करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मोखाडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन करत ही मागणी केली असून, कारवाई न झाल्यास गिरीश राजपाल यांच्या पेट्रोल पंपासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.सोबतच*लोकशाही मार्गाने* पुढील ठिकाणी आंदोलने करण्याचा इशारा आहे
१) टप्पा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर आंदोलन
२) टप्पा टॉवर वर चढून आंदोलन
३) टप्पा मा.I.G.साहेब नागपूर यांच्या कार्यालय समोर आंदोलन
४) मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन
५) टप्पा जय महाराष्ट्र न्यूज चॅनल च्या कार्यालय समोर आंदोलन
आज दि.११ मार्च २०२६ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर आंदोलन सुरु असतांना आपल्याला काहीनि अश्लील भाषेत शिविगाळ करत थांब तुले मारुनच टाकतो अशी धमकी दिली.
. *विल्सन मोखाडे वर्धा*
राजपालच्या डिझेल चोरीची सखोल चौकशी करा; मोखाडे यांचे आंदोलन, पत्रकार पाणबुडे यांच्यावर गंभीर आरोप















Leave a Reply