बामर्डा रेती घाट खून प्रकरण : वाळू माफियांच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई ? बुरांडे चा गोपनीय तपास करण्यात यावा ही मागणी ? 
चंद्रपूर: वरोरा तालुक्यातील बामर्डा रेती घाटावर पैशाच्या वादातून झालेल्या खून प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत वाळू माफियांच्या संघटित टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पोलीस स्टेशन वरोरा येथे दि. १ मार्च २०२६ रोजी फिर्यादी पंकज वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बामर्डा रेती घाटावर पैशाच्या वादातून आरोपींनी पोकलॅन्ड मशीन आडवी लावून घाटातून बाहेर पडण्याचा मार्ग बंद केला. त्यानंतर तलवारी व लाकडी दांड्यांनी सशस्त्र आरोपींनी भरत दयानंद नागपाल यांच्यावर हल्ला करून तलवारीने वार केले आणि त्यांना नदीच्या खोल पाण्यात फेकून दिले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.यावेळी फिर्यादी व त्यांच्या साथीदारांनाही मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या वाहनांची तोडफोड करून डिझेल टाकून गाड्या जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या घटनेवरून वरोरा पोलिसांनी गुन्हा क्र. ३७४/२६ नोंद करत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.या प्रकरणात अमोल रामचंद्र कामडी,सौरभ,अक्षय विजयराव खडसे,उदय भारकर वांदीले,नितीन यशवंत कामडी,अजय उर्फ गोलू दिपसिंग इरपाचे (म.प्र.),प्रकाश शंकर कासारे,प्रविण कवडुजी वासेकर,गितेशवसंतराव सातपुते,प्रफुल सूर्यभान उमाटे,सुनील नारायणराव झोरे आणि अतुल पुरुषोत्तम मोटघरे या आरोपींना अटक करण्यात आली आहे.तपासादरम्यान आरोपींनी संघटित टोळी तयार करून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी खून, खुनाचा प्रयत्न, अवैध दारू विक्री, जुगार, अवैध वाळू चोरी व वाहतूक यांसारखे गंभीर गुन्हे केल्याचे समोर आले. त्यामुळे आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ (मकोका) अंतर्गत कलम ३(१), ३(२), ३(३) व ३(४) प्रमाणे प्रस्ताव सादर करण्यात आला.या प्रस्तावास नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मंजुरी दिली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले करत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.या प्रकरणांत हल्ली शांत झोप घेत असलेला अक्षय बुरांडे हा सुद्धा रडारवर येण्याची शक्यता असून.याचा गोपनीय तपास सुरू आहे.असे सूत्रांनी सांगितले आहे.














Leave a Reply