आपण पहिलेच पोलिसांना सेटिंग केले आपले वाकडे होत नाही. काल्या नागाची बोंब..
अटक सौरभ ठाकूर आणि इतरांच्या तोंडून विषय पुढे येण्याची शक्यता.
वर्धा(मंगेश चोरे पाटील) रेती घाटातील हत्याकांडात अटक असलेल्या सौरभ ठाकूर याला नाहक गुंतविले आहे असा स्पष्ट आरोप ठाकूर परिवाराचा असून यात कोणतेही तलवार वगैरे वापरण्यात आले नसल्याचे बोलले जाते तर सौरभ ठाकूर याने कोणतीही तलवार मारलेली नाही किंवा त्याने या प्रकरणात मारहाणही केली नाही.असे एका प्रत्यक्ष दर्शीचे म्हणणे आहे.बुरांडे उर्फ काल्या नाग याच्या बातम्या प्रकाशित होताच याने संबंधित पोलिसांना संपर्क केला आता आपले काही होत नाही अशी बोंब हल्ली बुरांडे मारत असुन.जर हा या प्रकरणात गुंतलेला नाही तर हा संबंधित अधिकाऱ्यांना भेटला कश्याला ? आपण अधिकाऱ्यांना खुश करून आलो आता चिंता नाही असे ठाम पाने बुरांडे बोलत आहे.
परंतु अटक असलेल्या सौरभ ठाकूर याच्या बायानात बुरांडे याने दोन गटात काय लावलवी केली होती हे पुढे येणार आहे.वास्तविक ज्या घटावर हत्याकांड घडले तो घाट हा मृतकाचा नसल्याचेही पुढे आले.मग वास्तविक मृतक हे दुसऱ्याच्या घटावर का गेले?हा सुद्धा विषय महत्वाचा आहे. मृतकाचे सोबत असलेल्या एका व्यक्तीने सांगितल्या वरून असेही पुढे आले की.यात बुरांडे याने चांगली पिन भरली होती.त्यामुळे मृतक खुलासा करण्या करिता गेले.त्या पूर्वी दुसऱ्या बाजूलाही याने लावा लावी केली होती.त्यामुळे समज गैरसमज निर्माण झाले आणि भांडण झाले आणि शेवटी भांडणाचे रुपांतर हाणा मारीत झाले आणि घटना घडली.यात अनेक बारीक तपास होण्याची गरज असुन पोलिसांनी नाहक कुणालाही बकरे करू नयेत.करिता आमदार बाकाने यांनी गुप्तचर यंत्रणे कडून तपास मागितला आहे.या हत्याकांडात केवळ लावलवी हाच प्रमुख विषय असुन.सौरभ दिलीप ठाकूर याला जाणीव पुर्वक बळीचा बकरा करण्यात आल्याचे त्याच्या परिवाराचे आरोप आहे.वास्तविक ठाकूर आणि मृतक हे एकाच पक्ष्याचे असून यांच्यात कोणताही वाद नव्हता.मात्र दोन दिवसा पासून बुरांडे याने दोन्ही बाजूने लावा लावी करण्याचा प्रकार केला त्यामुळे हे हत्याकांड घडले असाही आरोप होत आहे. सौरभ याने जर मारहाण केली असती तर मृतकाचे सोबत असणाऱ्या शर्मा नामक इसमाला सुद्धा मारले असते? मात्र त्याने शर्मा यांना वाचविण्याचे काम केले या प्रकरणात सखोल चौकशीची गरज आहे.असे अनेकांचे मत असून या प्रकरणात हत्या ही मारल्याने झाली की पाण्यात दाबल्याने ? जर सौरभ हा नदी बाहेर शर्मा यांना वाचवत होता तर मग हत्या कोणी केली? हे अनेक विषय सी आय डी तपासात पुढे येईल…क्रमश वाचा. काल्या नागाची गाथा
..














Leave a Reply