Advertisement

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यावर मानवाधिकार आयोगात तक्रार.तर पंप मालक राजपाल यांची आय.ओ.सी कडे तक्रार.

समाचार शेयर करें

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यावर मानवाधिकार आयोगात तक्रार.तर पंप मालक राजपाल यांची आय.ओ.सी कडे तक्रार.

वर्धा(जिल्हा प्रतिनिधी)

वर्धा शहराच्या महिला आश्रम परिसरातील गिरीश राजपाल यांच्या पेट्रोल पंपातून अनेक दिवसा पासून भेसळ पेट्रोल डिझेल विकण्याच्या बातम्या पुढे येत होत्या.सरकारी डिपार्टमेंट च्या वाहनात याच ठिकाणाहून डिझेल भरले जाते.सरकारी वाहनाला चोरीचे डिझेल पेट्रोल विकणाऱ्या या पेट्रोल पंपावर दिनांक 1 मार्च 2026 ला चोरीचे पेट्रोल डिझेल पंपात टाकून विकण्या करिता आणत असताना रंगेहात पकडले.यावेळी गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी पुरवठा अधिकारी यांना सूचना दिली.आणि कायदेशीर कारवाई करिता बोलाविण्यात आले मात्र त्यांनी येण्यास नकार दिला.यावरून पेट्रोल पंप मालकाचे आणि पुरवठा अधिकारी यांच्यात काही हितसंबंध आहेत काय? याची शक्यता नाकारता येत नाही.या मुळे पोलिसांना तपासात अत्यंत मनस्ताप झाला.वास्तविक ही कारवाई पुरवठा अधिकारी यांच्यावर अवलंबून असून.हा प्रकार पोलिसांना घेऊन पकडण्याची कामही पुरवठा विभागाचेच आहेत.हे कोणत्याही कारवाया न करता हितसंबंध जोपासतात.असा आरोप होत असुन.यामुळे हे आपल्या अधिकाराचा गैरफायदा,आणि मानवी हक्काचे उल्लंगण आहे.करिता मानवाधिकार संघटनेच्या वतीने राज्य अध्यक्ष मंगेश चोरे(पाटील)यांनी मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल केली असून राजपाल यांच्या पेट्रोल पंप सील करण्यात यावा करिता.आय.ओ.सी मुंबई येथे करण्यात आली आहे.या व्यतिरिक्त उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेतून जोवर या विषयात न्यायनिवाडा होत नाही तोवर या पंपाला बंद ठेवण्यात यावे अशी विनंती न्यायालयात करण्यात येणार असे सांगण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!