शिवसेनेत अंतर्गत वाद तीव्र? पदाधिकारी गणेश ईखार यांच्या कार्यालयावर हल्ल्याचा आरोप 
वर्धा (प्रतिनिधी) वर्धा शहरात काल रात्री शिवसेनेचे पदाधिकारी गणेश ईखार यांच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.गणेश ईखार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कार्यालया बाहेरील पोस्टर फाडण्यात आले तसेच शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार घडला. या घटनेमागे शिवसेनेतीलच काही पदाधिकारी असू शकतात, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच जिल्हा प्रमुख यांच्यावरही त्यांनी संशय व्यक्त केला असल्याचे सांगितले जाते.घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याची प्रक्रिया सुरू असून फुटेज हाती आल्यानंतर संबंधितां विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे ईखार यांनी सांगितले.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून स्थानिक पातळीवर शिवसेनेत अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. अलीकडे झालेल्या शिवजयंती कार्यक्रमादरम्यान कार्यालय बंद असल्याचा मुद्दाही पुढे आला होता. यावरून संघटनेतील समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.या संदर्भात जिल्हा प्रमुख किंवा इतर संबंधित पदाधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. पोलिस तक्रार आणि सीसीटीव्ही फुटेजनंतरच या प्रकरणाचा नेमका खुलासा होणार असल्याचे बोलले जात आहे.














Leave a Reply