पोलिसांना चकमा देऊन पेट्रोल तस्कर गिरीश राजपाल फरार

वर्धा (मंगेश चोरे पाटील)
वर्धा शहरात सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या पेट्रोल चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी व पेट्रोल पंप मालक गिरीश राजपाल हा वर्धा पोलिसांना चकमा देऊन फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असून या प्रकरणात आणखी काही आरोपी पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वर्धा येथील महिला आश्रम परिसरातील पेट्रोल पंपावर मागील दहा वर्षांपासून पेट्रोल व डिझेलमध्ये भेसळ करून ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी छापा टाकून काही संशयितांना रंगेहात पकडले. चालक समीर शेख (रा. सेलू) आणि धाबेवाला रवी चोरे (रा. केलझर) यांना अटक करण्यात आली; मात्र मुख्य सूत्रधार म्हणून नाव असलेला गिरीश राजपाल फरार झाला आहे.
या कारवाईनंतर संबंधित पेट्रोल पंपावरील ग्राहकांची गर्दी कमी झाल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल-डिझेल तस्करीसाठी मोठी टोळी कार्यरत असून विविध ठिकाणांहून पेट्रोल चोरी करून रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या वाहनांद्वारे पंपावर आणले जात असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी अशा एका वाहनाला जप्त केले आहे. याच वाहनाला काही दिवसांपूर्वीही पकडण्यात आले होते. न्यायालयाने त्यावर ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती आहे. तसेच, पुन्हा असे वाहन पेट्रोल वाहतुकीत पकडल्यास दंड भरल्याशिवाय सुपूर्दनाम्यावर सोडण्यात येणार नाही, असे आदेशात नमूद असल्याचे समजते.
काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आर्थिक फायद्यासाठी संबंधित व्यक्तीने यापूर्वी अवैध दारू विक्रीचाही व्यवसाय केल्याची चर्चा आहे. कोरोना काळात त्याच्याकडून दारू खरेदी केल्याचा दावा काहींनी केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, परिसरात दोन गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणावर पेट्रोल-डिझेल साठा ठेवला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच पेट्रोलमध्ये भेसळ करण्यासाठी खुल्या बाजारातील इथेनॉलसारख्या पदार्थांचा वापर होत असल्याची चर्चा आहे. रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपाच्या मशीनमध्ये छेडछाड करून इंधन कमी प्रमाणात देण्याचे सेटिंग केले जात असल्याचा संशयही व्यक्त होत आहे. सकाळी मशीन पूर्ववत केली जात असल्याचे काही सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या प्रकरणाची तक्रार संबंधित ऑईल कंपनीकडेही करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांचा तपास सुरू असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके कार्यर
त आहेत














Leave a Reply