रेती चोरी प्रकरणात अक्षय बुरांडे उर्फ ‘काल्या नाग’ चौकशीच्या रडारवर?
लवकरच प्रकरणात होणार खुलासा
वर्धा (मंगेश चोरे पाटील) – वर्धा शहरातील कथित मुरूम तस्करी प्रकरण आणि मृतक श्री. नागपाल यांच्याशी संबंधित घडामोडींमध्ये अक्षय बुरांडे उर्फ ‘काल्या नाग’ यांचे नाव चर्चेत येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणा या प्रकरणात काही व्यक्तींची चौकशी करण्याची शक्यता तपासत आहे.
सावंगी येथील रेती घाटातून मोठ्या प्रमाणावर रेती उपसा व आर्थिक व्यवहारांबाबत काही मुद्दे समोर येत असल्याची चर्चा आहे. संबंधित व्यक्तींची भूमिका काय होती, याबाबत अधिकृत पातळीवर अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र गोपनीय माहितीनुसार काही संवाद आणि संपर्क यांची तपासणी होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मोबाईल कॉल रेकॉर्ड व डिजिटल संवादांची चौकशी झाल्यास काही बाबी स्पष्ट होऊ शकतात, असे तपासाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तींनी कायदेशीर सल्ला घेतल्याचीही चर्चा आहे.
तपास यंत्रणेकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.














Leave a Reply