Advertisement

रेती घाटात नागपालचा खून. अक्षय बुरांडे याने कट रचल्याची विश्वसनीय माहिती…?

समाचार शेयर करें

रेती घाटात नागपालचा खून.

अक्षय बुरांडे याने कट रचल्याची विश्वसनीय माहिती…?

वर्धा(मंगेश चोरे पाटील) काल रात्री रेती घाटात झालेल्या पुलगाव येथील नागपाल नामक इसमाची हत्या करण्यात आली.ही हत्या जाणीवपूर्वक कट करून करण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा असून या खुनाचा मास्टरमाईंड याचाच अलिखित भागीदार अक्षय बुरांडे उर्फ( काल्या नाग) असल्याचे चर्चेत आहे.

घाटात केवळ बाचाबाची झाली आणि बाचाबाचीचे रूपांतर झगड्यात झाले.उभे असलेले वाहने तोडली जे सी बी मशीन पेटविण्यात आली.आणि घाट मालक नागपाल याची हत्या करण्यात आली.आम्ही दोन दिवसापूर्वी सखी आणि सावंगी घाटात सुरू असलेल्या अवैध्य रेती चोरीच्या बातम्या प्रकाशित केल्या.यात वर्धेचा शिवसेना प्रमुख राजेश सराफ,आणि अक्षय बुरांडे उर्फ (काल्या नाग) हे दोन अलिखित भागीदार होते.नागपाल याचा पैसा आणि या दोघांची चांदी सुरू होती.एकीकडे आपण शिवसेना प्रमुख आहोत असा दबाव टाकून राजेश सराफ ,आणि बुरांडे झपाट्याने रेती चोरी करीत होते.तर दुसरीकडे ज्यांनी ही हत्या केली त्यांच्या सोबत पार्ट्या करीत होते ? असे चर्चेत आहे.या सर्व कारभारात नागपाल याचा अलगद काटा काढण्यात आला असून.बुरांडे याचा मोबाईल याचा मोठा पुरावा ठरू शकते.या सर्व खुनाचे रहस्य उलगडा करण्यात बुरांडे याचा मोबाईल पोलिसांना मोठा पुरावा ठरू शकतो. असे बोलले जाते.हत्या करणाऱ्या व्यक्तीला जाणीवपूर्वक भडकावून देण्याचे काम बुरांडे याने केले.जाणे करून ज्याची हत्या झाली त्याच्या हातापायाला दुखापत झाली तर तो घाटावर येणार नाही आणि आपण लुटमार करू असे यातील राजकारण असावे.मात्र दुर्दैवाने यात हत्या झाली.

मागील काळात सुद्धा याच बुरांडे याच्या मुजोरीच्या प्रकाराने याला बेदम झोडपले होते.याची हत्या होणार होती परंतु हा गाडीत लपला आणि.सुदैवाने वाचला. पोलिसांनी यातील बुरांडे याची सखोल चौकशी केल्यास या खुनाचे मुख्य सूत्रधार पुढे येतील असे चर्चेत

आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!