Advertisement

पेट्रोल तस्करीचा भांडाफोड; गिरीश राजपाल निघाला मोठा तस्कर… चोरीचे पेट्रोल पंपात ओतून जनतेला विकणाऱ्या भामट्याला पोलिसांनी रंगेहात पकडले 

समाचार शेयर करें

पेट्रोल तस्करीचा भांडाफोड; गिरीश राजपाल निघाला मोठा तस्कर…

चोरीचे पेट्रोल पंपात ओतून जनतेला विकणाऱ्या भामट्याला पोलिसांनी रंगेहात पकडले

पकडलेल्या पेट्रोल सोबत धाबेवाला रवी चोरे आणि चालक समीर शेख

वर्धा (मंगेश चोरे पाटील) – वर्धा शहरातील महिला आश्रम परिसरातील गिरीश राजपाल यांच्या पेट्रोल पंपावर भेसळयुक्त पेट्रोल व डिझेल विक्री होत असल्याच्या अनेक बातम्या यापूर्वी प्रकाशित करण्यात आल्या होत्या. या बातम्यांची दखल घेत गुन्हे शाखा सतर्क झाली होती.

दरम्यान, काल रात्रीच्या सुमारास एमएच-32 एएस-4843 क्रमांकाची इको गाडी भरधाव येताना पोलिसांच्या निदर्शनास आली. संशय आल्याने पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल आढळून आले. वाहनातील चालक समीर शेख (रा. सेलू) तसेच केळझर येथील रवी चोरे उर्फ धाबेवाला आढळून आले.

चौकशीदरम्यान हे पेट्रोल गिरीश राजपाल यांच्या पेट्रोल पंपावर विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचे उघड झाले. त्यानंतर अधिक तपास करून गिरीश राजपाल यांना आरोपी करून अटक करण्यात आली. या कारवाईत एकूण 5 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस तपासात असे समोर आले की, रवी चोरे हा गिरीश राजपाल यांच्या मदतीने केळझर येथील ‘आदित्य’ नावाच्या धाब्यावर नागपूरकडे जाणाऱ्या टँकरमधून चोरीचे पेट्रोल व डिझेल उतरवत असे आणि ते कमी दरात राजपाल यांना विकत असे.

या प्रकरणी आरोपी गिरीश राजपाल (रा. मोहिनी नगर, वर्धा), रवी चोरे (धाबेवाला, रा. केळझर) आणि समीर शेख (रा. सेलू) यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 3(5), 3(1), 181, 130, 177 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व सहाय्यक पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशी सिंह ठाकूर, होली समजदार, चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले, भूषण निघोट, प्रमोद पिसे, अमोल नगराळे, मंगेश चावरे, अरविंद इंगोले आदींनी

केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!