Advertisement

शिवसेना जिल्हा प्रमुख यांची उचलबांगडी होणार? सूत्रांची माहिती .जिल्ह्यात सराफ यांनी शिवसेना बुडविली हे उघड..

समाचार शेयर करें

शिवसेना जिल्हा प्रमुख यांची उचलबांगडी होणार? सूत्रांची माहिती .जिल्ह्यात सराफ यांनी शिवसेना बुडविली हे उघड..

वर्धा (मंगेश चोरे पाटील) – वर्धा जिल्ह्यातील शिवसेना नेतृत्व लवकरच बदलण्याचे स्पष्ट संकेत प्राप्त झाले असून, जिल्ह्यातील शिवसेनेचे अस्तित्व संपविण्यास सराफ कारणीभूत असल्याचे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील शिवसेना नेतृत्वात बदल होईल, असे संकेत प्राप्त झाले आहेत.

पक्षाच्या नावावर स्वतःची ठेकेदारी, रेती चोरी, दर्जाहीन कामे करून अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करणे आणि बिलांची उचल करणे असे अनेक प्रकार समोर आले आहेत. बातम्या प्रकाशित होताच सर्व विषय मुंबईपर्यंत पोहोचले आणि अखेर यांचा खरा चेहरा उघड झाल्याची चर्चा आहे.

नगरपरिषद काळात पक्षाकडून कोटी रुपये आले. उमेदवारांनी जीवाचे रान केले, लाखो रुपयांच्या खर्चात अडकले; मात्र जिल्हाप्रमुखांनी रातोरात इतर पक्षासोबत हातमिळवणी केल्याचा आरोप आहे.

आपल्याच उमेदवाराला पाडण्याचे मोठे षड्यंत्र रचल्याचीही चर्चा रंगली आहे. या सर्व प्रकरणाला आता महत्त्व प्राप्त झाले असून, लवकरच जिल्हाप्रमुखांची उचलबांगडी होणार, असे संकेत निर्माण झाले आहेत.

 

वाचा क्रमशः…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!