वर्धेत सरकारी वाहनांत चोरीचे डिझेल भरले जाते?
भेसळ प्रकरणानंतर राजपालचा पंप अडचणीत.पंप बुडण्याच्या मार्गावर,गर्दी झाली कमी…
हाच तो डिझेल तस्कर गिरीश राजपाल उर्फ बुकऱ्या
वर्धा (मंगेश चोरे पाटील) – मागील काही दिवसांपासून वर्धा शहरातील महिला आश्रम परिसरातील गिरीश राजपाल उर्फ ‘बुकऱ्या’ याच्या कथित इंधन व्यवहारांबाबत विविध तक्रारी पुढे येत आहेत. जिल्ह्यातील काही ठिकाणांहून चोरीचे डिझेल-पेट्रोल खरेदी करून ते आपल्या पेट्रोल पंपावरून विक्री केल्याचा आरोप स्थानिक पातळीवर चर्चेत आहे. भेसळयुक्त इंधनामुळे अनेकांची वाहने बिघडल्याच्या तक्रारी समोर आल्याने संबंधित पंपावरून इंधन भरणे अनेकांनी बंद केल्याचे सांगितले जात आहे.
अलीकडे काही सरकारी वाहनांतही याच पंपावरून डिझेल भरले जात असल्याची चर्चा असून, जर इंधनात भेसळ आढळली तर सरकारी वाहनांनाही बिघाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
इथेनॉल मिश्रण अनिवार्य झाल्यानंतर खुले बाजारातून इथेनॉल खरेदी करून अतिरिक्त प्रमाणात पेट्रोलमध्ये मिसळले जात असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर केला असल्याचे समजते. त्यामुळे वाहनांच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी वाढल्याचा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पंपावरून सरकारी वाहनांत इंधन भरणे तात्पुरते थांबवावे, अशी मागणी करत एक संघटना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
या सर्व आरोपांबाबत संबंधित पेट्रोल पंप मालकाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून सत्यस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांतून हो
त आहे.














Leave a Reply