वर्धा जिल्ह्यात शिवसेना ठेकेदारीत निघाली?
शिवजयंतीच्या दिवशी जिल्हाप्रमुख गायब शिवसैनिकांमध्ये नाराजी
हेच ते ठेकेदार असलेले शिवसेनेचे
वर्धा जिल्हा प्रमुख राजेश सराफ.
वर्धा (प्रतिनिधी) – आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत असताना वर्धा जिल्ह्यात मात्र वेगळीच चर्चा रंगताना दिसली. स्थानिक पातळीवर शिवसेना तर्फे अधिकृत कार्यक्रम न झाल्याने आणि जिल्हाप्रमुख अनुपस्थित राहिल्याने काही शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली.
राज्यात शिवसेनेचे प्रमुख नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केले असताना, वर्धा जिल्ह्यात पक्षाच्या वतीने औपचारिक कार्यक्रम न झाल्याची खंत कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली.
काही शिवसैनिकांनी आरोप केला की, जिल्हा प्रमुख राजेश सराफ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक ताकद कमी झाली असून पक्षाचा वापर केवळ ठेकेदारीपुरता केला जात आहे. “एकेकाळी वर्धा शहरात शिवसेना प्रभावी होती, मात्र सध्या संघटनापेक्षा इतर गोष्टींना प्राधान्य दिले जाते,” असा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला.
याशिवाय, मागील निवडणुकांमध्ये गुप्त राजकीय हातमिळवणी झाली, पक्षनिधीचा योग्य वापर झाला नाही, तसेच नगरपरिषद निवडणुकांमध्ये पदाधिकाऱ्यांना पुरेसा निधी देण्यात आला नाही, असेही आरोप चर्चेत असल्याचे सांगण्यात येत आहे. काहींनी पक्षनिधीच्या हिशोबाबाबतही प्रश्न उपस्थित केले.
मात्र या सर्व आरोपांबाबत जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. त्यांच्या बाजूने स्पष्टीकरण आल्यास तेही प्रसिद्ध केले जाईल.
दरम्यान, शिवजयंतीच्या दिवशी शहरात विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून मिरवणुका, अभिवादन कार्यक्रम आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात आले. मात्र शिवसेनेच्या स्थानिक पातळीवरील अनुपस्थितीची चर्चा दिवसभर सुरू होती.














Leave a Reply