सावंगी परिसरात पुन्हा कुंटणखाना सुरू?
नवऱ्याने सोडलेल्या महिलेचा नागपूरच्या वारांगना बोलावून धंदा?
वर्धा (मंगेश चोरे पाटील) मागील काळात या प्रकारावर आपण प्रकाश टाकला होता. प्रकरणाची मोठी चर्चा झाली आणि कुंटणखाना काही काळासाठी बंदही झाला. परिसरातील भाडेतत्त्वावर घेतलेले घर खाली करण्यात आले होते. मात्र, सध्या पुन्हा हा प्रकार सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून पुढे येत आहे.शहरातील एका नवऱ्याने सोडलेल्या महिलेच्या माध्यमातून हा प्रकार सुरू असल्याचे सांगितले जाते. नागपूर येथून काही महिलांना दररोज सावंगी भागात आणले जात असल्याची चर्चा आहे. सध्या भाड्याचे ठराविक घर नसून, पसंतीनुसार पैसे आकारले जातात आणि त्यानंतर संबंधित महिलांना तात्पुरत्या स्वरूपात ग्राहकांच्या ताब्यात देण्यात येते, असे एका उपभोगत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.या विषयावर गोपनीयरीत्या सविस्तर माहिती घेतली असता, शहरातील एका सुशिक्षित कुटुंबातील तरुणी हा प्रकार चालवत असल्याचेही समजते. अत्यंत शिताफीने हा कारभार सुरू असून, पोलिसांनी सापळा लावला तरी ठोस पुरावे मिळविणे कठीण असल्याचे बोलले जात आहे.शहरात स्वतःला मोठे समजणारा आणि पैशासाठी काहीही करण्यास तयार असलेला एक व्यक्तीही या धंद्यात सहभागी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
क्रमशः…
ती आणि तो कोण?














Leave a Reply