Advertisement

पोलिस भरतीत जुगाड लावतो म्हणणाऱ्यांपासून सावधान!

समाचार शेयर करें

पोलिस भरतीत जुगाड लावतो म्हणणाऱ्यांपासून सावधान!

जनहितार्थ प्रसिद्धी (वर्धा प्रतिनिधी.)
      सध्या सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेबाबत काही भ्रामक अफवा आणि प्रलोभने पसरवली जात असल्याचे समोर येत आहे. “आम्ही हमखास नोकरी लावून देतो”, “ओळखीने काम करून देतो”, “वरपर्यंत हात आहे” अशा प्रकारच्या दाव्यांद्वारे काही व्यक्ती उमेदवारांची दिशाभूल करत आहेत.

मात्र हे स्पष्ट समजून घ्यावे की पोलिस भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, नियमबद्ध आणि गुणवत्ता आधारित असते. कोणत्याही प्रकारचे जुगाड, शिफारस, ओळख किंवा आर्थिक व्यवहार या प्रक्रियेत चालत नाहीत. संपूर्ण निवड प्रक्रिया ही शासनाच्या निश्चित निकषांनुसारच राबवली जाते.

सूत्रांच्या माहितीनुसार काही स्वयंघोषित पत्रकार किंवा मध्यस्थ व्यक्ती, “राजकीय ओळख” किंवा “पोलिस मित्र” असल्याचे सांगून उमेदवारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ऐकिवात आले आहे. अशा फसव्या लोकांच्या जाळ्यात अडकू नका. अनेक प्रकरणांत पैसे घेतल्यानंतर संपर्क तोडणे किंवा उत्तीर्ण उमेदवारांच्या नावावरून पैसे हडप करण्याचे प्रकारही समोर आले आहेत.पोलिस भरतीत कोणतेही शिफारशीचे राजकारण चालत नाही.गुणवत्ता, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेच्या आधारेच निवड होते.पैशाचे व्यवहार करून नोकरी मिळते हा गैरसमज आहे.अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांविरोधात तक्रार करणे हीच योग्य भूमिका आहे.जनतेने आणि उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता सजग राहावे. “जुगाड लावतो” म्हणणाऱ्यांचे पितळ उघडे पाडा आणि अशा व्यक्तींना ठाम विरोध करा.

नोकरी ही केवळ प्रामाणिक प्रयत्न, परिश्रम आणि गुणवत्तेच्या जोरावरच मिळते  हेच सत्य आहे.

सावधान रहा, सतर्क रहा. जनहितार्थ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!