पोलिस भरती प्रक्रियेला विशेष पोलिस महासंचालक संदीप पाटील यांची पाहणी 
वर्धा (मंगेश चोरे पाटील) सुरू असलेल्या वर्धा पोलिस भरती प्रक्रियेची विशेष पोलिस महासंचालक, नागपूर परिक्षेत्र संदीप पाटील यांनी काल प्रत्यक्ष पाहणी केली. भरती प्रक्रियेतील पारदर्शकता, शिस्तबद्ध नियोजन आणि सुरळीत कामकाज याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी त्यांनी विविध टप्प्यांची सविस्तर माहिती घेतली तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही आवश्यक सूचना दिल्या. उमेदवारांच्या सोयीसुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि तांत्रिक बाबींचा आढावाही त्यांनी घेतला.
सदर भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आढळून आल्या नसल्याची नोंद करण्यात आली. मोठ्या संख्येने उमेदवारांनी उपस्थिती दर्शवली असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भरती प्रक्रियेचा सातत्याने आढावा घेऊन योग्य मार्गदर्शन करणाऱ्या विशेष पोलिस महासंचालक संदीप पाटील तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात आले.














Leave a Reply