ए महार भडवी” म्हणत बौद्ध मुलीचा सार्वजनिक अपमान
नागपूर(प्रतिनिधी)
नागपूरात ॲट्रॉसिटी ॲक्टखाली गुन्हा होऊनही आरोपी मोकाट – प्रशासनाची गंभीर उदासीनता**
नागपूर येथील मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये सहाय्यक फिजिशियन म्हणून कार्यरत असलेल्या पूनम ताई यांना जाणीवपूर्वक टार्गेट करत डॉक्टर समीर पालोदकर या नराधमाने सार्वजनिक ठिकाणी अत्यंत घृणास्पद जातीय शिवीगाळ केली. “ए महार भडवी” अशा नीच आणि अमानवी शब्दांत आरडाओरड करून एका बौद्ध महिलेला अपमानित करण्याचा हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे.
या घटनेमुळे भयभीत झालेल्या पूनम ताईंनी तात्काळ 112 वर कॉल करून पोलिसांची मदत घेतली व आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. सदर गुन्हा सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी ॲक्ट) तसेच अन्य गंभीर कलमांखाली नोंदवण्यात आला आहे.
तरीही आजतागायत आरोपीला अटक करण्यात आलेली नाही, ही बाब अत्यंत धक्कादायक व चिंताजनक आहे. ॲट्रॉसिटी ॲक्टसारख्या कडक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊनही पोलिसांकडून होत असलेली दिरंगाई म्हणजे दलित महिलांच्या सुरक्षिततेबाबत शासन व प्रशासनाची स्पष्ट उदासीनता दर्शवते.
राज्याचे गृहमंत्री ज्या नागपूर शहरातून येतात, त्याच नागपूरमध्ये जर दलित बेटी सुरक्षित नसेल, तर हे संपूर्ण राज्यासाठी लज्जास्पद आहे. सार्वजनिक ठिकाणी एका दलित महिलेला जातीय शिवीगाळ करण्याचे धाडस कोणी करत असेल, तर त्याला कठोरात कठोर कारवाईचा धडा शिकवला गेलाच पाहिजे.
आम्ही ठाम शब्दांत मागणी करतो की आरोपीला तात्काळ अटक करून कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा या अन्यायाविरोधात राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडले जाईल. दलित बेटीवर अन्याय झाला आणि प्रशासन गप्प बसले, तर आम्हीही शांत बसणार नाही.
या प्रकरणाची तात्काळ गंभीर दखल गृहमंत्र्यांनी घ्यावी. अन्यथा होणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल.














Leave a Reply