Advertisement

केळझर गावात लोखंडी सलाख व इंधन तस्करीचा धंदा पुन्हा जोरात; तत्काळ कारवाईची मागणी

समाचार शेयर करें

केळझर गावात लोखंडी सलाख व इंधन तस्करीचा धंदा पुन्हा जोरात; तत्काळ कारवाईची मागणी


वर्धा (प्रतिनिधी) नागपूर मार्गाने इतर राज्यांत जाणाऱ्या लोखंडी सलाखांच्या चोरीचा मोठा अवैध धंदा केळझर गावात पुन्हा सुरू झाल्याची माहिती पुढे आली आहे. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिझेल व पेट्रोलची तस्करीही सुरू असल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरीचे साहित्य वर्धा येथील गिरीश राजपाल यांच्याकडून खरेदी केले जात असल्याचा आरोप आहे. या ठिकाणी दररोज लाखो रुपयांची तस्करी होत असल्याचे सांगितले जात असून, सदर अवैध धंदा सेलू पोलीस ठाण्यातील डी.बी. प्रमुखांच्या आशीर्वादाने सुरू असल्याच्या चर्चा परिसरात आहेत. तसेच, इतर काही अधिकाऱ्यांनीही अलिखित परवानगी दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा धाबा रवी चोरे यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले जात असून, सेलू व नागपूर येथील काही व्यक्तींच्या सहकार्याने हा अवैध व्यवसाय चालविला जात असल्याचा आरोप आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!