Advertisement

शिवसेनेचे युवा नेतृत्व चोरी करताना आले कॅमेऱ्यात… हा शार्दुल कोण?

समाचार शेयर करें

हा शार्दुल कोण?

वर्धा (मंगेश चोरे पाटील) – सध्या वर्धा जिल्ह्यात शिवसेनेची प्रतिमा मलिन करणारे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील एक पदाधिकारी आणि नुकतेच नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलेले युवा नेतृत्व शार्दुल वंदिले हे रात्रीच्या अंधारात सिरिज (लाईटची माळ) चोरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची घटना समोर आली आहे.

आता यावर जिल्हाप्रमुख काय भूमिका घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवजयंतीच्या दिवशी न दिसणारे हेच युवा नेतृत्व मात्र लोकांच्या घरांवरील सिरिज चोरताना कॅमेऱ्यात अडकत असल्याने ही शोकांतिका म्हणावी लागेल.

बातमीत संबंधित चोरीचा व्हिडिओ स्पष्टपणे दाखविण्यात आला असून वाचकांनी तो पाहून विचार करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. नेमका महाराष्ट्र कुठे चालला आहे, असा सवालही उपस्थित होत आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार गहिरे मनात ठेवणे आवश्यक आहे. केवळ अंगावर भगवा पांघरून कोणी शिवसैनिक होत नाही, तर त्यासाठी आचरणही तितकेच शुद्ध असणे गरजेचे आहे. मात्र असे युवा नेतृत्व लोकांच्या घरांवरील सिरिज चोरताना कॅमेऱ्यात दिसत असल्याचे सांगितले जात आहे.

या व्हिडिओमध्ये दोन चाकी वाहनाचा लाईट सुरू करून सिरिज कशी चोरली जाते, हे दिसून येते. केवळ शंभर रुपयांची सिरिज चोरी करणारा व्यक्ती खरोखर शिवाजी महाराजांच्या विचारांचा शिपाई होऊ शकतो का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वाचा आणि विचार करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!