Advertisement

सेलू पोलिस ठाण्यासमोर आंदोलन ? पोलिस महासंचालकांना गावकऱ्यांचे निवेदन..खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याची मागणी

समाचार शेयर करें

सेलू पोलिस ठाण्यासमोर आंदोलन ? पोलिस महासंचालकांना गावकऱ्यांचे निवेदन..खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याची मागणी

वर्धा (प्रतिनिधी) – केळझर गावात खुलेआम सुरू असलेल्या डिझेल-पेट्रोल व लोखंड तस्करीच्या प्रकारांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अवैध धंद्यांना कुणाचे आश्रय आहे का, असा प्रश्न गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.महामार्गावरील पुलाखाली इंधन काढले जात असल्याची चर्चा असून, अशा प्रकारामुळे मोठा अपघात किंवा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर एखादी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिक करत आहेत.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठिकाणी इंधन साठा आणि लोखंडी साहित्याची आवक-जावक सुरू असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर अनेक बातम्या प्रकाशित होऊनही ठोस कारवाई का होत नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काही नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली असल्याचे समजते. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आल्याची माहिती आहे.परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने तपास व कारवाई होणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!