सावंगी ठाणेदारांचा दणका; राजपालची अवैध पेट्रोल–डिझेल चोरी बंद, डिझेल जप्त करून कारवाई..

वर्धा (प्रतिनिधी)
सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत, नायरा डेपो परिसरात गिरीश राजपाल याच्या हॉटेलात सुरू असलेल्या अवैध डिझेल-पेट्रोल चोरीच्या धंद्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत हा गोरखधंदा बंद केल्याची माहिती समोर आली आहे.
चोरीचे व भेसळयुक्त डिझेल-पेट्रोल आपल्या पेट्रोल पंपात ओतून ग्राहकांना विकले जात असल्याने अनेक वाहनांमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी संबंधित पंपावरून इंधन भरणे टाळले, परिणामी त्या पंपाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात घटला .
यापूर्वी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेत वर्धा पोलीस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सावंगीचे ठाणेदार यांनी अचानक छापा टाकून कारवाई केली. या कारवाईदरम्यान काही प्रमाणात डिझेल-पेट्रोल आढळून आले असून पोलिसांनी ते जप्त करून संबंधित ठिकाणचा अवैध धंदा बंद केला आहे.
पुढील काळात अशा प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे निर्देश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. तथापि, एका बंद पडलेल्या हॉटेलात हा अवैध धंदा गुपचूप सुरू असल्याचीही माहिती पुढे आली असून गुन्हे शाखेने त्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. हा गोरखधंदा कायमस्वरूपी बंद करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.














Leave a Reply