पोलिसांचा पेट्रोल पंप बंद पडणारा गिरीश राजपाल करतो हजारो लिटर डिझेल पेट्रोल ची हेराफेरी.
शहरात हजारो लिटर डिझेल पेट्रोलचा साठा,धोक्याचा.
वर्धा (प्रतिनिधी – मंगेश चोरे पाटील)
वर्धा शहरात पोलिसांचा पेट्रोल पंप बंद पडण्यामागे गिरीश राजपाल उर्फ ‘बुकऱ्या’ याचा सहभाग असल्याचा आरोप होत असून, तो दररोज हजारो लिटर डिझेल व पेट्रोलची चोरी करून आपल्या पेट्रोल पंपावर विक्री करीत असल्याची गंभीर माहिती समोर येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, हा कथित बेकायदेशीर धंदा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून, मागील काळात तत्कालीन पोलिस अधीक्षक श्री. जैन यांच्या कार्यकाळात हा प्रकार बंद पडला होता. मात्र अलीकडे पोलिसांच्या आडून हा धंदा सुरू झाल्याचे बोलले जात आहे. काल रात्री एका वर्तमानपत्राच्या पंचनाम्यात या इंधन चोरीचे चित्रीकरण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पुलगाव रोडवर राजपाल यांच्या मालकीचे एक हॉटेल असून, ते भाडे तत्वावर दिल्याचा दावा केला जातो. मात्र याच ठिकाणाहून सर्व कथित गोरखधंदा चालवला जात असल्याचा आरोप आहे. नायरा डेपोमधून निघणाऱ्या टँकरमधून दररोज हजारो लिटर डिझेल व पेट्रोल चोरी करून त्यामध्ये काही द्रव मिसळून विक्री केली जाते, अशी माहिती पुढे येत आहे.
या पेट्रोल पंपावरून टाकलेल्या इंधनामुळे अनेक वाहनांमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर आल्या असून, यासंदर्भात यापूर्वीही बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. मात्र तरीही हा कथित धंदा अविरत सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पोलिसांचा पेट्रोल पंप मजूर झाल्यानंतर पुन्हा सुरू झाला असला तरी, तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्यावर न्यायालयीन दबाव निर्माण करण्यासाठी राजपाल यांनी मोठा खर्च केल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
कोणालाही न जुमानता राजपाल राजरोसपणे हा धंदा करीत असल्याचे सांगितले जात असून, याबाबत वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यास तो उलट पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करीत असल्याचेही बोलले जात आहे.
नायरा डेपो सुरू झाल्यापासून हा कथित गोरखधंदा वाढत चालल्याने मोठ्या स्फोटाची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आलेला इंधन साठा पेट्रोल पंपाच्या मागील दोन घरांमध्ये साठवून ठेवला जात असल्याचा आरोप असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात महिला आश्रम परिसर असल्याने, एखादी दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वर्धा पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी नम्र विनंती नागरिकांकडून करण्यात येत आहे.














Leave a Reply