चालताही न येणाऱ्या शोभा तडस यांना उमेदवारी; देवळीतील सभांनी भाजपची अडचण वाढवली

देवळी | प्रतिनिधी (मंगेश चोरे पाटील)
देवळी नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून देण्यात आलेल्या उमेदवारीवर आता उघड प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांना उमेदवारी देण्यात आली असली तरी त्यांचे वाढते वय आणि शारीरिक असमर्थता यामुळे ही उमेदवारी चर्चेचा विषय ठरत आहे. “बाईला चालताही येत नाही, मग निवडणूक कशी लढवणार?” असा थेट सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
काँग्रेसचे माजी मंत्री यांनी देवळीतील सभेत जोरदार टोले लगावत ही बाब अधोरेखित केली. “राज्यात लाडकी बहीण योजना सुरू आहे, मग देवळीत लाडकी बायको योजना सुरू झाली आहे काय?” असा उपरोधिक सवाल करत त्यांनी सभा गाजवली. या वक्तव्याला उपस्थितांकडून मोठी दाद मिळाली.
दरम्यान, उशिरा सुरू झालेल्या मुख्यमंत्री यांच्या सभेतून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उठून जाणे, हे भाजपसाठी आणखी धक्कादायक ठरले. यामुळे शोभा तडस यांच्या उमेदवारीबाबत पक्षांतर्गत अस्वस्थता वाढल्याची चर्चा आहे.
तडस परिवारातील नाराजी दूर करण्यासाठी विविध प्रलोभने दिली जात असल्याची चर्चा असली, तरी जनता मात्र त्यांच्या जुन्या राजकीय इतिहासाकडे बोट दाखवत आहे. “भाजप सत्तेत आहे, आमदार भाजपचा आहे,” असे सांगितले जात असले तरी, “स्वतःकडे नेमके कोणते पद आहे?” असा सवालही आता उघडपणे विचारला जात आहे.
घरातच दिलेली ही उमेदवारी भाजपसाठी डोकेदुखी ठरत असून, देवळी नगराध्यक्षपद भाजपच्या हातातून निसटण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.














Leave a Reply