तडस परिवाराचे अस्तित्व संपत चालले?
“आता अडाणी नेते नकोरे बाप्पा!” देवळीत राजकीय चर्चा

वर्धा | मंगेश चोरे पाटील
लोकसभेच्या निवडणुकीत बहुमताने पराभव पत्करलेल्या माजी खासदार रामदास तडस यांनी पुन्हा एकदा देवळी नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी आपल्या पत्नीला मैदानात उतरवले आहे. मात्र, सध्याचे राजकीय वातावरण पाहता नागरिकांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत असून, तडस यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवायला जनता तयार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच प्रलोभनांची भाषा सुरू झाल्याची चर्चा आहे. मात्र, “या वेळेस पतंग कापायचीच” असा निर्धार अनेक मतदार व्यक्त करत आहेत.
देवळीमध्ये सध्या तडस परिवाराबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. “तडस परिवार म्हणजे तमाशांचा मेळा झाला आहे” असे खुलेपणाने बोलले जात आहे. मागील काळात मुलानेच आपल्या आईविरोधात उमेदवार उभा केल्याने मोठा राजकीय तमाशा उभा राहिला होता. आई निवडून येऊन नगराध्यक्षा झाल्या, तर मुलानेच भ्रष्टाचाराचे आरोप पुढे आणले. पोलीस प्रकरणे, न्यायालयीन लढाया आणि वर्षानुवर्षे चाललेला संघर्ष हे सगळे आजही जनतेच्या स्मरणात आहे.
आज परिस्थिती अशी आहे की देवळीमध्ये तडस यांचे राजकीय अस्तित्व झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र आहे. “ही निवडणूकच त्यांचे अस्तित्व ठरवणारी ठरेल” अशी शंका मतदार व्यक्त करत आहेत.
नगराध्यक्ष हा शहराचा प्रथम नागरिक असतो. ज्याला नगर सांभाळायचे असते. “जे स्वतःचे घर सांभाळू शकत नाहीत, ते गाव काय सांभाळणार?” असा थेट सवाल नागरिक करत आहेत. स्वतःची संततीच जुमानत नसताना मतदारांनी का विश्वास ठेवावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वडील माजी खासदार, आई माजी नगराध्यक्षा आणि मुलगा मात्र वादग्रस्त कारनाम्यांनी सतत चर्चेत. वाळू, लग्न, प्रकरणे, दबाव, दडपशाही सगळे काही गावाने पाहिले आहे. एका प्रकरणात पीडित महिला थेट आमच्याकडे आली. बातमी प्रसिद्ध होताच ती दिल्लीपर्यंत पोहोचली. माध्यमांचा गदारोळ झाला. तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री. होळकर यांनी दबावाला न झुकता कायदेशीर मार्गाचा सल्ला दिला. पोलीस बंदोबस्तात लग्न झाले. माध्यमांसमोर मोठी आश्वासने दिली गेली, पण काही काळातच सून वाऱ्यावर सोडली गेली.
आज देवळीत एकच सवाल आहे
“सून वाऱ्यावर सोडणारे लोक गाव वाऱ्यावर सोडणार नाहीत याची खात्री कोण देणार?”
देवळीच्या जनतेला आता चारित्र्यवान, विश्वासू, शिक्षित नेतृत्व हवे आहे.
“अडाणी नेते नकोत” हा सूर सर्वत्र ऐकू येत आहे.
म्हणूनच आता प्रश्न एकच
या निवडणुकीत तडस परिवाराची पतंग कापली जाणार का?














Leave a Reply