आयपीएस सदानंद दाते होणार महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक
वर्धा | मंगेश चोरे (पाटील)
ज्येष्ठ आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) प्रमुख सदानंद दाते हे महाराष्ट्र राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून ३ जानेवारी रोजी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा वाढीव दोन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने त्यांच्या जागी दाते यांची नियुक्ती होणार आहे.
श्री. सदानंद दाते हे अत्यंत शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि न्यायप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. कोणावरही अन्याय होणार नाही याची विशेष दखल घेणारे अधिकारी म्हणून त्यांची प्रशासकीय कारकीर्द ओळखली जाते.
त्यांचा काही काळ वर्धा जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) म्हणून कार्यकाळ राहिला आहे. त्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंडगिरी आणि अवैध दारू व्यवसाय फोफावलेला असतानाही दाते साहेबांनी कठोर आणि परिणामकारक कारवाई करत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
त्यांच्या या प्रदीर्घ आणि प्रेरणादायी प्रवासासाठी पंचनामा वृत्तसमूहाकडून आयपीएस सदानंदजी दाते यांना हार्दिक शुभेच्छा.
आयपीएस सदानंद दाते होणार महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक














Leave a Reply