Advertisement

**आर्वी नाका परिसरात कथित ब्लॅकमेलिंगचा प्रकार पुन्हा चर्चेत

समाचार शेयर करें

**आर्वी नाका परिसरात कथित ब्लॅकमेलिंगचा प्रकार पुन्हा चर्चेत.सावधान,सावधान,सावधान.

घरोघरी पोळ्या करणारी महिला असल्याचा आरोप**

वर्धा (मंगेश चोरे पाटील)
वर्धा शहरात काही महिन्यांपूर्वी महिलांकडून ब्लॅकमेलिंगचे प्रकार उघडकीस येऊन मोठी खळबळ उडाली होती. हा विषय काही काळ शांत झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आर्वी नाका परिसरात कथित ब्लॅकमेलिंगचा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, घरोघरी पोळ्या करण्याचे काम करणारी एक महिला काही व्यक्तींशी ओळख वाढवून त्यांच्याशी जवळीक साधते. त्यानंतर कालांतराने संबंधित व्यक्तींची बदनामी करण्याची भीती दाखवून पैशांची मागणी केली जात असल्याचे आरोप गोपनीय सूत्रांकडून करण्यात येत आहेत. बदनामी व अपप्रचार करण्याच्या धमक्या देऊन आर्थिक उकळ केल्याचेही सांगण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मागील काळात आर्वी नाका परिसरातील जोशी कुटुंबाच्या घरी काम करत असताना या महिलेमुळे घरगुती वाद निर्माण झाले आणि त्यामुळे संबंधित कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाल्याचा आरोपही करण्यात येतो. मात्र या संदर्भात अधिकृत तक्रार अथवा पोलिस नोंद असल्याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

सदर महिला सध्या वर्धा शहरातील विविध ठिकाणी काम करत असल्याची माहिती असून, ज्या ठिकाणी ती काम करते त्या ठिकाणी काही व्यक्तींचा एक समूह सामूहिक बदनामी करण्यासाठी सक्रिय असल्याचेही बोलले जात आहे. या कथित गटामध्ये काही महिला, काही तरुणी तसेच काही पुरुषांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. फोनद्वारे बदनामीच्या धमक्या देऊन पैसे उकळल्याचे प्रकार घडत असल्याचेही समजते.

आमच्या प्रतिनिधींनी आर्वी नाका परिसरात केलेल्या गुप्त चौकशीत स्थानिक नागरिकांनी या महिलेबाबत थेट संबंध नसल्याचे सांगितले. सदर महिला ही वर्धा शहराची मूळ रहिवासी नसून नागपूर जिल्ह्यातील असल्याची माहितीही पुढे आली आहे.

या प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार किंवा पोलिस कारवाई समोर आलेली नसली, तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कथित ब्लॅकमेलिंग प्रकरणाचा सविस्तर खुलासा, नावासह माहिती आणि अधिक तपशील पुढील भागात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

वाचा पुढील भागात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!