छत्रपती सेनेच्या शहर अध्यक्षपदी समीर अग्रवाल यांची नियुक्ती.
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारात ला अनुसरून स्थापन करण्यात आलेल्या छत्रपती सेना या संघटनेच्या वर्धा शहर अध्यक्षपदी समीर अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती आज विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष श्री मंगेश चौरे पाटील, यांचे सह राज्य कार्याध्यक्ष प्राध्यापक रमेश चौधरी, राज्य महासचिव श्री दिलीप भुजाडे, सर्व प्रांत अध्यक्ष श्री राजेशजी झांबरे, विदर्भ उपाध्यक्ष वर्धा जिल्हा विशेष सचिव सूर्यप्रकाश पांडे,श्री.प्रकाश दोडाणी वर्धा जिल्हा उपाध्यक्ष,श्री.जितेंद्र झाडे, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत तिळले पेंटर त्यांच्या उपस्थितीत संस्थापक अध्यक्ष श्री मंगेश चोरे (पाटील ) यांनी नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती केली. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष बोलताना म्हणाले की सदर संघटना ही सामाजिक संघटना असून या संघटनेचा आणि राजकारणाचा दूरपर्यंत संबंध नाही, पुढील काळात संघटनेच्या वतीने गोरगरिबांच्या दृष्टीने विविध असे कार्यक्रम राबविले जाणार आहे दिनांक 31 डिसेंबर रोजी, सर्व जनता हे पार्ट्या करण्यात मग्न असताना आमची संघटना शहरातील उघड्यावर थंडीत झोपलेल्या लोकांना ब्लॅंकेट वाटेल असाच आमचा उपक्रम सातत्याने सुरू राहील यावेळी प्राध्यापक चौधरी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दिलीप भुजाडे यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप श्री सूर्यप्रकाश पांडे यांनी केला यावेळी सर्वांनी अग्रवाल यांना शुभेच्छा दिल्या,की श्री कृष्ण दिवेदी, सागर नरबरिया, विशाल डोडानी, अजित नाडे, आशिष सिंग, बादल साहू इत्यादींनी आभार मानले.














Leave a Reply