सावंगीत लाच घेताना डॉ. ललित वाघमारे यांचा पी.ए.ला रंगेहात पकडले
ऍडमिशन प्रकरण झाले उघड… वाघमारे यांच्या आणखी प्रकरणांची शक्यता?
वर्धा (मंगेश चोरे पाटील):
सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) सध्या अदानी ग्रुपच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या या महाविद्यालयात मोठा भूकंप घडला आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या बोळवणीसह काही जणांच्या सेवेतून हकालपट्टी झाली असताना, आता लाचखोरीचा धक्कादायक मुद्दा समोर आला आहे.
महाविद्यालयातील सर्वेसर्वा मानले जाणारे डॉ. ललित वाघमारे यांच्या पी.ए.ला पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले असून, त्याची तत्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे.काय आहे संपूर्ण प्रकरण?
प्राप्त माहितीनुसार, या संस्थेत ऍडमिशन प्रक्रियेत डॉ. ललित वाघमारे यांच्या पी.ए.चा मोठा हस्तक्षेप असल्याची माहिती नवीन व्यवस्थापनाला गुप्तरीत्या मिळाली होती. नवीन मॅनेजमेंटने या संशयाची खात्री करण्यासाठी एक विशेष ट्रॅप लावला.ट्रॅपदरम्यान पी.ए. पाच लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडला, आणि लगेच त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
यामागे कोण? सर्वत्र चर्चा…पी.ए.ने हा संपूर्ण व्यवहार कुणाच्या सांगण्यावरून केला? यामागे कोणाचा मोठा हात आहे?
या प्रश्नांवर परिसरात आणि रुग्णालयात मोठी चर्चा सुरू आहे.
क्रमशः पी ए लावला नागपूरच्या दवाखान्यात कामाला….














Leave a Reply