कारंजा ‘आम्ली पदार्थ’ प्रकरणात राजकारण्यांचा थयथयाट पोलिस यंत्रणेवर खापर फोडण्याचा प्रयत्न
वर्धा (प्रतिनिधी – मंगेश चोरे पाटील)वर्धा जिल्यातील कारंजा येथे दोन दिवसांपूर्वी नार्कोटिक विभागाने एक कथित ‘आम्ली पदार्थ’ तयार करणारा कारखाना पकडल्याचा दावा करण्यात आला. या ठिकाणाहून कोट्यवधी रुपये किमतीचे एम.डी ड्रग्ज मिळाल्याची चर्चा जोरात आहे. मात्र, हे पदार्थ खरोखर एम.डी ड्रग्जच होते का? याबाबत अद्याप अधिकृत खुलासा झालेला नाही.
या घटनेवरून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात वर्धा पोलिस यंत्रणेवर जोरदार टीका झाली. “कारखाना सुरू असताना पोलिसांना माहिती कशी पडली नाही?”, “वर्धा पोलिस कुचकामी आहेत” अशा आरोपांची मालिका सुरू आहे. पण तज्ज्ञांच्या मते, संपूर्ण प्रकरणाकडे अतिरंजित पद्धतीने पाहिले जात असल्याची शक्यता अधिक आहे.
एम.डी ड्रग्ज हा अत्यंत महागडा आणि तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचा आम्ली पदार्थ आहे. याचे पुरवठे विदेशातूनच मोठ्या प्रमाणावर होतात.करंजासारख्या छोट्या गावात एम.डी तयार करणे अवघड , असे तज्ज्ञांचे मत आहे.
एम.डी तयार करताना प्रचंड दुर्गंधी निर्माण होते मात्र त्या परिसरात अशी कोणतीही दुर्गंधी जाणवली नाही , असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
सूत्रांच्या माहितीप्रमाणे, ज्या प्लॉटवर ही कारवाई झाली तो आरोपींनी काही दिवसांपूर्वीच विकत घेतला होता आणि साधारण आठ दिवसांपासून काही ‘तांत्रिक काम’ सुरू होते. परंतु दुर्गंधी नसल्यामुळे स्थानिकांना संशय आला नाही आणि माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली नाही.
“कोट्यवधींचं ड्रग्ज पकडलं” असा प्रचार केला जात असला तरी वस्तुस्थिती अनेक प्रश्न निर्माण करते पदार्थ एम.डी होता की फक्त त्यासारखी दिसणारी रासायनिक सामग्री?
यूट्यूबवर पाहून बनवलेला काही ‘सेटअप’ तर नव्हता?
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमतींचा आधार घेत जाणीवपूर्वक मोठी हवा तर नाही केली?
सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, “दुर्गंधीच नसेल तर ते एम.डी कसे असू शकते? आणि तसा निश्चित तपास न होता पोलिसांवर टीका करणे योग्य नाही.”
या प्रकरणानंतर वर्धा पोलिस अधीक्षकांनी कारंजा ठाण्याचे ठाणेदार यांची बदली केली आहे.
तथापि, या प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षकांवरही नाहक राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.














Leave a Reply