वर्ध्यात शिवसेनेच्या रॅलीने केला विक्रम,
जीवाभावाचे लोक उतरले रस्त्यावर
वर्धा (प्रतिनिधी)– आज शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविकांत बालपांडे यांच्या विक्रमी प्रचार रॅलीने वर्धा शहरात जनतेचे प्रचंड आकर्षण ठरले. विशेष म्हणजे, या मिरवणुकीत किरायची माणसं नव्हती, तर स्वखुशीने, उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले लोक होते, ही बाब उल्लेखनीय ठरली.
या रॅलीत मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड,हास्यजत्रा, फेम गौरव मोरे, शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार, शिवसेना आमदार मनिषा ताई कायंदे , लोकसभा संपर्क प्रमुख राज दीक्षित,जिल्हा प्रमुख राजेश सराफ,गणेश ईखार .आदी मान्यवर उपस्थित होते.
दुपारी बारा वाजता शहराच्या मुख्य मार्गावरून निघालेली ही मिरवणूक जेव्हा बाजार लाईन परिसरात पोहचली, तेव्हा व्यापारी वर्गाने फटाक्यांची आतषबाजी करून आणि हार घालून बालपांडे यांचे जोरदार स्वागत केले. ही रॅलीची जमेची बाजू मानली जात आहे. शहरातील सर्वच समाजघटकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने जनतेत चर्चांना ऊत आला होता. वर्धा नगरपरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रमुख लढत काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) अर्थात रविकांत बालपांडे< यांच्यात होणार, तर भाजपचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहील असा जनतेचा अंदाज आता स्पष्ट होऊ लागला आहे.
यावेळी जातीचे समीकरण हे उमेदवारावर येऊन ठेपले असून, सरसगट रविकांत बालपांडे आघाडीवरअसल्याचे चित्र जनतेत दिसू लागले आहे. शिवसेनेच्या मिरवणुकीनंतर वातावरण पालटल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
या विक्रमी मिरवणुकीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आला.














Leave a Reply