बाप्पा, आता खूप झाली.
वर्धा (प्रतिनिधी) — नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला पराभूत करण्यासाठी सार्वत्रिक मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे दिसते. जिल्ह्यात जातीचे समीकरण तुटले आहे. ही निवडणूक जातीवर नाही तर माणसावर आली आहे. आणि यात बालपांडे यांच्या बाजूने वाढता कौल आहे.
माजी नगराध्यक्ष श्री. आकाशभाऊ शेंडे यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण खांद्यावर घेतल्याने वातावरणात नवनिर्मिती झाली आहे. विकासाच्या दृष्टीने बालपांडे हेच एक पर्याय दिसत असल्याने, भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेच्या तंबूत खुलेआम दिसत आहेत. त्यामुळे भाजप उमेदवारावर आलेली नाराजी स्पष्ट होते.
विशेष म्हणजे, कुणबी समाजही आता भाजप उमेदवारापासून दूर होत चालला असून, जातीपातीचे राजकारण न करता गावाच्या विकासाच्या दृष्टीने “बालपांडे हाच पर्याय”, असे जनता बोलताना दिसते.













Leave a Reply