राजकारण आमचा पिंड नाही, शहराचा विकास हेच आमचे ध्येय आहे – जिल्हा प्रमुख राजेश सराफ
वर्धा (मंगेश चोरे पाटील)
वर्धा जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांनी शिवसेना उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले आहे. “शहराचा विकास हेच आमचे ध्येय आणि प्रामाणिक, पारदर्शक कार्यप्रणाली हीच आमची ओळख असेल,” असे ते म्हणाले.
सराफ हे वर्धा शहरातील एक परिपूर्ण कंत्राटदार आहेत. राजकारण त्यांच्या पिढीजात आहे; मात्र त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून पक्षावर निष्ठा ठेवत पक्ष मजबूत केला. सध्या वर्धा नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाचे उमेदवार रविकांत बालपांडे हे रिंगणात आहेत. वास्तविक ही उमेदवारी अकस्मात जाहीर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
राज्यात शिवसेना पक्ष सत्तेत आहे आणि श्री. एकनाथ शिंदे हे पक्षप्रमुख राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आम्ही सर्वप्रथम जिल्ह्याचे आमदार आणि पालकमंत्री पंकज भोयर यांच्या पुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता. आमच्या काही अत्यल्प उमेदवारीच्या मागणीला मात्र पालकमंत्री भोयर यांनी स्पष्ट नकार दिल्याने आम्ही रविकांत बालपांडे यांची उमेदवारी दाखल केली.
आमच्या पक्षप्रमुखांकडून वर्धा विकासाचे आश्वासन मिळाल्यामुळे आम्ही जोमाने कामाला लागलो. आणि जनतेने आमचा आत्मविश्वास वाढविला. आज आम्हाला खात्री आहे की जनतेचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे. विशेष म्हणजे, नगरविकास खाते हे शिंदे साहेबांकडे असल्यामुळे आम्हाला योग्य असा निधी प्राप्त होऊन शहराचा विकास निश्चितपणे साध्य होईल, असे त्यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यात जातीसमीकरणाला काहीही महत्त्व नाही. आमच्या सोबत सर्व जाती-धर्माची मंडळी रोज निस्वार्थी झटत आहेत. आज शिवसेना पक्षाच्या उमेदवारीमुळे भारतीय जनता पक्षात धडकी भरली आहे, हे मात्र तेवढेच खरे!














Leave a Reply