Advertisement

वर्धा नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये ‘बालपांडे’ चर्चेच्या केंद्रस्थानी!

समाचार शेयर करें

वर्धा नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये ‘बालपांडे’ चर्चेच्या केंद्रस्थानी!
नगरपरिषदेच्या राजकारणात समीकरणांचे फेरबदल, पक्षांतर्गत खळबळ माजली.
वर्धा (मंगेश चोरे पाटील)  वर्धा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला रंगत येत असून वातावरणात अचानक बदल जाणवत आहे. राजकारण हा विषय जितका गुंतागुंतीचा तितकाच अनिश्चित… कोण, कोणाचा आणि कधी कोणाशी? हे सांगणं कठीण! आता काहीसे असेच चित्र वर्धा नगरपरिषद निवडणुकीत दिसू लागले आहे.
सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षात उमेदवारीवरून नाराजीचे स्वर . पक्ष वाढीसाठी मेहनत घेणाऱ्यांच्या उमेदवारी कापल्या गेल्या, आणि “लायकीचे गेले, भोपुंजी पुढे आले” अशी कुजबुज होत आहे. पक्षाशी बंड न करता, मात्र अधिकृत उमेदवाराला थेट आडवे करण्याची तयारी काही मंडळींनी केल्याचे सूत्रांकडून समजते. शिंदे गटाशी जवळीक, राज्यात सरकार, नगरविकास खात्याचे नेतृत्व शिंदे साहेबांकडे त्यामुळे “विकासाची सरळ दिशा म्हणजे बालपांडे” असे समीकरण काही कार्यकर्त्यांमध्ये तयार होऊ लागले आहे. तेली समाजातील मतदारांचाही झुकाव त्यांच्याकडे असल्याचे जाणवते.
काँग्रेसच्या उमेदवारामुळे तेली-कुणबी समीकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. “आपला उमेदवार पुढे आमदार होऊ शकतो” या विचाराने काही समाजगट स्वतःच पर्याय शोधताना दिसत आहेत. काँग्रेसचा अधिकृत उमेदवार पसंतीस उतरत नसल्याचेही बोलले जाते भाजपची अंतर्गत नाराजी, काँग्रेसची कमकुवत पकड, आणि समाजघटकांचे बदलते समीकरण यामुळे रविकांत बालपांडे हे एक सर्वसमावेशक, स्वीकारार्ह आणि प्रभावी नाव. म्हणून पुढे येताना दिसते. मागील दोन दिवसांत बालपांडे यांच्या नावावर राजकीय चर्चेची धुरा फिरताना स्पष्ट जाणवते.“वातावरण बदललंय… आता नाव एकच घुमतंय  बालपांडेच का?”
पक्ष सोडले नाहीत,  मनांचे ‘समीकरण बदलले’ असेच म्हणावे लागेल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!