आता नाही! आगे बढो पीछे चलो ? भारतीय जनता पक्षात प्रचंड नाराजी, पर्याय रविकांत बालपांडे वर्ध्यात निवडणुकीचे राजकारण तापले!
वर्धा (प्रतिनिधी) नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा थरार शिगेला पोहोचला असून, भारतीय जनता पक्षात नाराजीनं चांगलाच उच्चांक गाठला आहे. पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि स्थानिक नेतृत्व मागे पडल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे. काही जण तर आपल्या नाराजीचा सूर थेट प्रसारमाध्यमांमधून व्यक्त करीत आहेत.“आता नाही, आगे बढो .. ” असं म्हणत कार्यकर्त्यांमध्ये निराशेचं वातावरण दिसून येत आहे. काही जणांसाठी ही शेवटची संधी असल्याचं सांगत, दावेदारी असूनही त्यांना दुर्लक्षित केल्याचा आरोप ठोकला जात आहे. अनेकांनी होल्डिंग, प्रचार साधने, बैठकांद्वारे आपल्या उमेदवारीचा जोर दाखविला होता; मात्र शेवटी निर्णय काही मोजक्यांच्या फायद्याकडे झुकला असा त्यांच्या नाराजीचा सूर आहे.
दरम्यान, या नाराजीवर गांभीर्याने विचार केला जाईल, अशी अंतर्गत पातळीवर संकेत मिळत असले, तरी निराश झालेल्या घटकांचे मनोधैर्य पुन्हा मिळवणे, भाजपा नेतृत्वासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.दुसरीकडे काँग्रेसमध्येही असमाधानाचे वातावरण असून, आतापर्यंत भाजप विरुद्ध काँग्रेस हा पारंपरिक विचार तुटताना दिसत आहे.
या साऱ्या घडामोडींना कलाटणी देणारा निर्णय शिवसेना (शिंदे गट) कडून नुकताच घेण्यात आला रविकांत बालपांडे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर होताच राजकीय समीकरणे अक्षरशः पालटली आहेत.बालपांडे यांच्या उमेदवारीने एकच खळबळ उडाली. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवविचारवंत, शिवसैनिक, तरुण वर्ग आणि स्थानिक नेतृत्व मोठ्या प्रमाणात बालपांडे यांच्या पाठीशी उभा राहताना दिसत आहे.बालपांडे हे स्वच्छ, प्रामाणिक आणि सर्वसमावेशक संपर्क असलेला चेहरा म्हणून ओळखले जातात.त्यांची राज्यस्तरीय नाळ मजबूत असून, विशेषतः ग्रामविकास खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असल्याने वर्ध्याला मोठा निधी मिळण्याची शक्यता. मतदारवर्गात जोरदार चर्चा विषय बनली आहे.ते तेली समाजातील असले तरी सर्व समाजांमध्ये त्यांचा मजबूत संपर्क आणि तळागाळातील जनतेचा विश्वास असल्याने त्यांना सर्वसमावेशक समर्थन मिळत आहे वर्धा नगरपरिषदेत गेल्या अनेक वर्षांत ‘खबोगिरी’, निर्णयक्षमतेचा अभाव आणि कार्यक्षमता नसल्याची ओरड मतदारांनी वेळोवेळी केली आहे.आता मात्र मतदार स्पष्टपणे म्हणू लागले आहेत“वेळ बदलाची, नेतृत्व प्रामाणिक आणि परिणामकारक हवे!”या पार्श्वभूमीवर बालपांडे यांच्या उमेदवारीनं केवळ शिवसेना नव्हे तर सर्व विरोधी गटांमध्येही नवीन जागरूकता निर्माण केली आहे.वर्ध्यातील नगराध्यक्ष पदाची निवडणूक आता केवळ पक्षांपुरती मर्यादित राहिली नसून, प्रतिष्ठा, नाराजी, विश्वास आणि प्रामाणिक नेतृत्व या चार शब्दांभोवती फिरताना दिसत आहे.‘आगे बढ़ो’ की ‘पीछे चलो’ या प्रश्नाचे उत्तर मतपेटीतूनच मिळणार आहे!असे चर्चेत आहे.














Leave a Reply