महिला आश्रम परिसरातील राजपाल पेट्रोल पंपावर भेसळ पेट्रोलचा संशय पुन्हा दोन नवीन वाहनांचे इंजिन खराब

हेच ते महिला आश्रम पेट्रोल पंपाचे मालक श्री गिरीश राजपाल उर्फ(बुकऱ्या) यांनी डिझेल पेट्रोल तस्करीचा कळस गाठला आहे.
वर्धा ( मंगेश चोरे पाटील) महिला आश्रम परिसरातील राजपाल पेट्रोल पंपावर पुन्हा एकदा भेसळ पेट्रोलचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मागील काही महिन्यांपासून या पंपावरील पेट्रोलमुळे दोन नवीन दुचाकी वाहनांचे इंजिन खराब झाल्याचे प्रकरण ग्राहक मंचात दाखल करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांनी या पंपावरून पेट्रोल भरणे टाळले होते. मात्र, काल पुन्हा दोन नवीन वाहनांचे इंजिन खराब झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
वाहन धारकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहने पूर्णपणे टाकी भरून पेट्रोल भरल्यानंतर काही वेळातच इंजिनमध्ये बिघाड झाले. मेकॅनिकांकडे वाहने तपासणीसाठी नेल्यावर इंजिनाच्या आतील भागात कार्बनसारखे काळे चिकट पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळले. प्राथमिक अंदाजाने पेट्रोलमध्ये अतिरिक्त इथेनॉल किंवा इतर रासायनिक पदार्थांचे मिश्रण असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
विशेषतः, कमी प्रमाणात पेट्रोल भरणाऱ्यांच्या वाहनात काहीही त्रास होत नसून, ज्या वाहन धारकांनी मोठ्या प्रमाणात टाकी फुल भर केली, त्यांचीच वाहने खराब होत असल्याचे लक्षात आले आहे. यावरून पेट्रोलमध्ये भेसळीचा संशय अधिक बळकट होत आहे.
या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित पंपावरून पेट्रोल घेणे टाळावे असा इशारा जनतेतून दिला जात आहे. भेसळ पेट्रोलमुळे वाहनांचे आर्थिक व तांत्रिक नुकसान होत असल्याने वाहन धारकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
या घटनेवर संबंधित विभागाने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी वाहन धारक तसेच नागरिकांकडून होत आहे.













Leave a Reply