रेती चोरी करणाऱ्या रोपींवर गुन्हा दाखल; वाहतूक शाखेची कारवाई

वर्धा (प्रतिनिधी) दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांच्या आदेशान्वये आर्वी नाका परिसरात वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी केली असता, अवैधरीत्या रेती वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर आणि ट्राली अडवून त्यातील रेतीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला.कारवाईदरम्यान ट्रॅक्टर क्रमांक MH 32 AJ 0478 आणि ट्राली क्रमांक MH 32 P 5017 मधून अडीच ब्रास रेती, तसेच ४ फावडे, ४ घमेंले असा एकूण ₹7,16,400 किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. रेती वाहतुकीसाठी आवश्यक असलेला TP पास किंवा अधिकृत परवाना चालकांकडे नसल्याचे तपासात स्पष्ट झाले. श्रावण रघुनाथ नेहारे (वय 45 वर्षे, रा. उमरी मेघे) गोवर्धन महादेव राऊत (क्लिनर, वय 35 वर्षे, रा. पिंपरी मेघे)दोघांवरही पोलीस स्टेशन रामनगर येथे रेती चोरी व अवैध वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास पाटील, सहाय्यक फौजदार मंगेश येळणे, पो. हवा. आशिष देशमुख, किशोर पाटील तसेच वाहतूक शाखेच्या पथकाने केली.














Leave a Reply